चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2017)
काझुओ इशिगोरो यांना नोबेल पुरस्कार जाहीर :
- 2017चा साहित्यातील नोबेल पुरस्कार ब्रिटीश लेखक काझुओ इशिगोरो यांना जाहीर झाला आहे.
- ‘नॉवेल्स ऑफ ग्रेट इमोशनल फोर्स’ या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
- या पुरस्कारासाठी मार्गारेट अॅटवूड, नूगी वा थिओंगो आणि हरुकी मुराकामी हे लेखकही शर्यतीत होते. मात्र, नोबेलवर अखेर इशिगोरो यांचे नाव कोरले गेले.
- जगाशी जोडल्या गेलेल्या भ्रामक भावनांचा उलगडा त्यांनी आपल्या ‘नॉवेल्स ऑफ ग्रेट इमोशनल फोर्स’ या पुस्तकातून केल्याचे स्वीडिश अॅकेडमीने सांगितले आहे.
- इशिगोरो (वय 64 वर्षे) यांचा जन्म जपानमध्ये झाला असून ते पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंबिय युकेमध्ये स्थलांतरित झाले.
- इशिगोरो यांनी लिहीलेले ‘द रिमेन्स ऑफ दि डे’ (1989) या प्रसिद्ध कादंबरीवर एक सिनेमाही येऊन गेला आहे. इशिगोरो यांनी आठ पुस्तके लिहीली आहेत. त्याचबरोबर त्यांनी सिनेमा आणि टिव्ही कार्यक्रमांसाठी लेखनही केले आहे.
मुकेश अंबानी ठरले दहाव्यांदा देशातील सर्वाधिक श्रीमंत :
- ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने जाहीर केलेल्या 2017 मधील भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग 10 व्या वर्षी सर्वोच्च स्थानी आले आहेत. त्यांची संपत्ती 38 अब्ज डॉलर म्हणजेच अडीच लाख कोटी रुपये झाली आहे.
- फोर्ब्सने जारी केलेल्या ‘इंडिया रिच लिस्ट 2017’ या अहवालानुसार, विप्रो उद्योग समूहाचे प्रमुख अजीम प्रेमजी दुसर्या स्थानी असून, त्यांची संपत्ती 19 अब्ज डॉलर झाली आहे. त्यांनी दोन स्थानांची प्रगती केली आहे. गेल्या वर्षी दुसर्या स्थानी असलेले सन फार्माचे दिलीप शांघवी नवव्या स्थानी घसरले आहेत. त्यांची संपत्ती 12.1 अब्ज डॉलर झाली आहे.
- योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी मोठी झेप घेतली आहे. गेल्या वर्षी 48 व्या स्थानी असलेले बालकृष्ण यंदा 19 व्या स्थानी आले आहेत.
- भारतातील पहिल्या 100 श्रीमंतांच्या यादीत 7 महिलांचा समावेश आहे. ओ.पी. जिंदाल उद्योग समूहाच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल 16 व्या स्थानी असून त्यांची संपत्ती 7.5 अब्ज डॉलर आहे.
- लुपिनच्या बिगरकार्यकारी चेअरमन मंजू देशबंधू गुप्ता 3.40 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 40 व्या स्थानी आहेत.
- बेनेट, कोलमन अॅण्ड कंपनीच्या इंदू जैन आणि त्यांच्या दोन मुलांची संपत्ती 3 अब्ज डॉलर असून ते 51 व्या स्थानी आहेत.
- टाफेच्या मल्लिका श्रीनिवासन, यूएसव्ही इंडियाच्या लीना तिवारी (71 वे स्थान), बायोकॉनच्या संस्थापक किरण मुजुमदार-शॉ (72 वे स्थान) यांचा या यादीत समावेश आहे.
- तसेच मुजुमदार-शॉ या स्वबळावर अब्जाधीश झालेल्या महिलांच्या यादीत प्रथम स्थानी आहेत.
जागतिक बाजारात आता मनी ट्रेड कॉइन :
- वित्तीय गुंतवणूक, विदेश चलन विनिमय आणि डिजिटल करन्सी व्यवहार करता यावेत, म्हणून मनी ट्रेड कॉइन आता दुबईतील नोव्हा एक्सचेंज बाजाराद्वारे जागतिक बाजारपेठेत आली आहे.
- दुबईतील बुर्ज अल अरबमध्ये 40 अतिमहत्त्वाच्या व्यावसायिकांच्या उपस्थितीत मनी ट्रेड कॉइनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित लखनपाल आणि एच.ई. शेख सकीर अल नहयान यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
- मनी ट्रेड कॉइनमुळे क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार आणि ज्ञान ई-अॅकॅडमी व ई-पोर्टलच्या माध्यमातून सुलभ झाले आहेत. मनी ट्रेड कॉइनद्वारे इथरिअम, रिपल, मोरेनो बिटकॉइन यांचे व्यवहार करता येणार आहेत.
- लवकरच 1 हजार 88 क्रिप्टोकरन्सीअंतर्गत चलनबदल करता येईल. त्यामुळे वेळेची बचत होऊन खर्चही कमी होणार आहे. या सेवेमुळे रोख बाळगण्याची गरज भासणार नसून लवचीक आणि परिणामकारकपणे व्यवहार करणे शक्य होणार आहे.
- अमित लखनपाल यांनी सांगितले की, लवकरच स्वित्झर्लंड आणि भारतातील गुंतवणूकदारांचा या कंपनीत सहभाग होईल. भारतातील चलनबदलासाठी हे व्यासपीठ असून येत्या 19 ऑक्टोबरपासून त्याची सुरुवात होईल.
- मनी ट्रेड कॉइनतर्फे प्रत्यक्ष डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच डिजिटल कार्ड लवकरच काही निवडक देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर मनी ट्रेड कॉइनमार्फत ऑनलाइन शॉपिंग, विमानाची तिकिटे काढता येणार आहेत. या व्यवहारांमधील नफ्याचा 5 टक्के वाटा यूएईमधील धर्मादाय संस्थांना आणि 15 टक्के वाटा कल्याणकारी न्यासांना दिला जाणार आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते मंगला बनसोडे यांचा गौरव :
- भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा सर्जनशील कलेसाठीचा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर (सातारा) यांना जाहीर झाला आहे.
- तसेच 9 ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जाईल.
- केंद्राच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. यंदा सर्जनशील कलेसाठी मंगला बनसोडे यांचा गौरव केला जाणार आहे.
- तमाशासारख्या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा सन्मान या पुरस्काराच्या निमित्ताने होत असल्याने अखेर सरकार दरबारी लोककलावंतांची दखल घेतली गेल्याची भावना लोककलावंत व्यक्त करत आहेत.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा