Current Affairs of 6 September 2015 For MPSC Exams

 चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2015)

ऑस्ट्रिया व जर्मनीने आपली उघड केली सीमा :

  • हंगेरीच्या सीमेवर जमलेल्या हजारो निर्वासितांना आश्रय देण्यासाठी ऑस्ट्रिया व जर्मनीने आपली सीमा उघड केली आहे.
  • सीरियातील स्थलांतरितांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
  • सीरियातून हंगेरीत आश्रय घेतलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
  • तर, ऑस्ट्रियामध्येही समुद्रामार्गे 6 हजार नागरिक आश्रयासाठी पोहचले आहेत.

शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी “कॅशलेस मेडिक्‍लेम” योजना लागू :

  • राज्यातील शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी “कॅशलेस मेडिक्‍लेम” योजना लागू करण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.
  • ठाण्यात राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली.
  • शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष शिक्षक आमदार रामनाथ मोते व नागो गाणार यांनी सुचवलेली ही योजना आता लागू होणार आहे.
  • राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आजारात या योजनेचा फायदा होईल.
  • राज्यातील शेकडो रुग्णालये या योजनेशी जोडली जाणार आहेत.
  • सध्या आजारांवर उपचार घेतल्यानंतर मेडिकल बिल मंजूर करून घेण्यासाठी विलंब लागतो.
  • या नवीन योजनेत शिक्षकांना मेडिकल कार्ड दिले जाणार असून, रुग्णालयात ते दाखविल्यावर पैसे न भरता उपचार घेता येतील,‘ असे शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
  • राज्यातील साडेसात लाख शिक्षकांना शिक्षकदिनी दिलेली ही मोठी भेट आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी दिली.

अपूर्वी चंदेलाने एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकले :

  • युवा भारतीय नेमबाज अपूर्वी चंदेलाने पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करताना आज येथे आयएसएसएफ रायफल आणि पिस्टल वर्ल्डकप फायनल्स महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकले.
  • जयपूरच्या 22 वर्षीय अपूर्वीने 206.9 गुणांसह रौप्यपदक मिळविले.
  • ती सुवर्णपदक जिंकणाऱ्या इराणच्या अहमादी इलाहेल हिच्यापेक्षा फक्त 0.6 गुणाने मागे राहिली.
  • अहमादी इलाहेलने 207.5 गुण मिळविले.
  • तर सर्बियाच्या आंद्रिया अर्सोविचने शूट ऑफमध्ये क्रोएशियाच्या वेलेनटिना गस्टिन हिला मागे टाकत कांस्यपदक जिंकले.

एनएसई आणि स्टॉक एक्स्चेंज ऑफ मॉरिशस एसईएम यांच्यात सामंजस्य करार :

  • भांडवलविषयक ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि स्टॉक एक्स्चेंज ऑफ मॉरिशस (एसईएम) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
  • या करारांतर्गत नव्या निर्देशांकाची निर्मिती करण्याविषयी प्रयत्न केला जाणार आहे.
  • तसेच दोन्ही भांडवल बाजार समन्वयाने यापुढे काम करणार आहेत.
  • दोन्ही शेअर बाजार मिळून सिक्युरिटीज मार्केट्स, निर्देशांक निर्मिती आणि भांडवलविषयक नव्या योजना यांसाठी प्रशिक्षण, शिक्षण तसेच ज्ञानाचे आदानप्रदान करणार आहेत.
  • अशा प्रयत्नामुळे दोन्ही देशांतील व्यापारविषयक संबंध अधिक दृढ होतील.

महिलांची पूर्ण सेवाकाळासाठी नियुक्ती करण्यास परवानगी :

  • लष्कर व हवाई दलापाठोपाठ नौदलातही महिलांची पूर्ण सेवाकाळासाठी नियुक्ती करण्यास दिल्ली हायकोर्टाने परवानगी दिली आहे.
  • यामुळे देशरक्षणाच्या तिन्ही आघाड्यांवर महिलांचे कर्तृत्व झळाळणार आहे.
  • नौदलात आत्तापर्यंत महिला अधिकाऱ्यांची कमाल 14 वर्षांसाठीच नियुक्ती होत असे.
  • संरक्षण दलांमध्ये पेन्शनसाठी 20 वर्षांच्या सेवाकाळ पूर्ततेची अट असल्याने, महिलांना त्यापासून वंचित राहावे लागत होते.
  • याविरोधात नौदलातील 19 महिला अधिकाऱ्यांनी दिल्ली हायकोर्टाकडे दाद मागितली होती.
  • या याचिकेत त्यांनी लष्कर व हवाई दलातील महिला अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पूर्ण सेवाकाळ नियुक्तीकडे लक्ष वेधले होते व हा भेदाभेद संपवण्याची विनंती केली होती.
  • त्यानंतर हायकोर्टाने हा निर्णय घेतला.
  • संरक्षण दलांत महिलांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीचा मुद्दा 2010 साली दिल्ली हायकोर्टाकडेच एका याचिकेद्वारे आला होता.
  • त्यावर हायकोर्टाने या दोन्ही दलांमध्ये महिलांना पूर्ण सेवाकाळाचा अधिकार बहाल केला होता.
  • तेव्हापासून लष्कर व हवाई दलात पुरुष-महिला अधिकारी समान स्तरावर आले.

दिनविशेष :

  • 1968 : स्वाझीलँडला स्वातंत्र्य.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago