Current Affairs of 6 September 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2017)
भारतीय लष्करी अकादमीचे नवे प्रमुख संजय कुमार झा :
- भारतीय लष्करी अकादमीचे (आयएमए) 48 वे प्रमुख (कमांडंट) म्हणून लेफ्टनंट जनरल संजय कुमार झा यांनी सूत्रे हाती घेतली.
- ले.जनरल झा हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि ‘आयएमए’चे माजी विद्यार्थी आहेत.
- 13 डिसेंबर 1980 रोजी 17 व्या शीख रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. 36 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली.
- राष्ट्रीय रायफल्स बटॅलियन, आसाम रायफल्स आणि ईशान्येकडील माउंटन विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
- उत्कृष्ट कामगिरी व सवेबद्दल झा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):
बुलडाणा आयडॉल स्पर्धेत मुनावर अली ठरला महाविजेता :
- शहरी व ग्रामीण भागातील होतकरू कलाकारांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना कला सादर करण्यासाठी संधी देण्याबरोबरच सतत नावीन्य स्वीकारण्याचा अनोखा संगम साधणार्या बुलडाणा अर्बन परिवाराच्या कर्मचारी गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या बुलडाणा आयडॉल स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यात औरंगाबादच्या मुनावर अली याने महाविजेता होण्याचा मान मिळविला.
- शहरी व ग्रामीण कलारसिकांच्या साक्षीने आणि प्रेक्षकांनी खचून भरलेल्या गर्दे वाचनालयाच्या सभागृहात बुलडाणा आयडॉल स्पर्धेच्या महाअंतिम (ग्रॅण्डफिनाले) सोहळ्याची अत्यंत जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.
- आयडॉल स्पध्रेमध्ये औरंगाबादच्या मुनावर अली याने स्पर्धेच्यातीनही फेरीत उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम बाजी मारून महाविजेते पदाचा किताब मिळविला. यावेळी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर, राजेंद्र काळे यांच्या हस्ते मुनावर अलीला 11 हजार 111 रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
- तसेच या स्पर्धेत किशोर राजपूत यास व्दितीय, तर श्रद्धा वानखेडे व शिवदास साठे यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.
ब्लू व्हेल गेम शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार :
- ‘ब्लू व्हेल गेम’मुळे भारतात अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना वाढत असतानाच आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.
- ब्लू व्हेल गेमची लिंक शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने तामिळनाडू पोलिसांना दिले आहेत.
- तसेच यासंदर्भात केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारने 8 सप्टेंबरपर्यंत कोर्टात उत्तर द्यावे, असेही हायकोर्टाने म्हटले आहे.
- मदुराई विद्यापीठात शिकणाऱ्या विघ्नेश या विद्यार्थ्याने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली होती. ब्लू व्हेल गेममुळे त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- ब्लू व्हेल गेमच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्या असून, राज्यात हा गेम कोणीही डाऊनलोड करु शकणार नाही, असे पोलिसांनी हायकोर्टात सांगितले. पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यावर हायकोर्टाने पोलिसांना ब्लू व्हेल गेम शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मीराबाई आणि संजीता चानू राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेसाठी पात्र :
- सेखोम मीराबाई चानू आणि संजीता चानू यांनी ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल सिनियर भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये आपापल्या गटात सुवर्ण पदके जिंकून पुढील वर्षी आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पात्रता मिळविली आहे.
- मीराबाईने स्रॅचमध्ये 85 किलो तसेच क्लीन अॅन्ड जर्क प्रकारात 104 किलो असे एकूण 189 किलो वजन उचलून 48 किलो वजन गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. दरम्यान तिने स्रॅच प्रकारात नवा राष्ट्रकुल विक्रम देखील नोंदविला.
- संजीताने महिलांच्या 53 किलो वजन गटात स्रॅचमध्ये 85 तसेच क्लन अॅन्ड जर्कमध्ये 110 असे एकूण 195 किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले.
- तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजनदेखील पुढील वर्षी गोल्ड कोस्ट येथेच होणार आहे.
दिनविशेष :
- मुंबईचे पूरक बंदर म्हणून न्हावाशेवा बंदरास सरकारने 6 सप्टेंबर 1980 मध्ये मंजुरी दिली.
- ‘फ्लाइंग सिक्ख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू आहेत. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. 1958च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा