Current Affairs (चालू घडामोडी) of 7 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | लालकृष्ण आडवाणी, रामदेव बाबांना मिळणार पद्म पुरस्कार |
2. | भाजपाच्या प्रदेशाअध्यक्षपदी रावसाहेब दानवे |
3. | सॅमसंगची बिझनेस कार्डपेक्षाही छोटी हार्डडिस्क |
4. | दिनविशेष |
लालकृष्ण आडवाणी, रामदेव बाबांना मिळणार पद्म पुरस्कार :
- मोदी सरकार भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘पद्म’ पुरस्काराने गौरव करणार आहे.
- तसेच पद्म पुरस्काराच्या यादीत लालकृष्ण आडवाणी, योगगुरू बाबा रामदेव व प्रा.डेव्हिल फॉली यांच्या नावाचा समावेश आहे.
भाजपाच्या प्रदेशाअध्यक्षपदी रावसाहेब दानवे :
- भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय मंत्री आणि खासदार रावसाहेब दानवे याची नियुक्ती करण्यात आली.
- नियुक्ती झाल्यामुळे दानवे केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सॅमसंगची बिझनेस कार्डपेक्षाही छोटी हार्डडिस्क :
- सिगेटने केवळ 7 मिमि जाडी असलेली सॅमसंगने बिझनेस कार्डपेक्षाही छोटी हार्डडिस्क सादर केली आहे.
- संघनकासाठी तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या 5.25 इंच हार्डडिस्क निर्मितीच्या 35व्या स्मृतिदिनांनिमित्त कंपन्यांनी नवीन हार्डडिस्क सादर केल्या आहेत.
- सीगेटने 500 जीबी क्षमता असलेली तसेच केवळ 7 मिमि जाडी असलेली हार्डडिस्क सादर केली आहे.
- त्याची किम्मत 99 डॉलर एवढी असून ती केवळ अमेरिकेमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- सॅमसंगची बिझनेस कार्डपेक्षाही छोटी आणि केवळ 28.34 ग्राम वजन असलेली तसेच 1 टेरा बाईट माहिती साठवण्याची याची क्षमता आहे.
- 250 जीबी आणि 500 जीबी क्षमतेची हार्डडिस्क उपलब्ध केल्या आहेत.
दिनविशेष :
- 1610 – गॅलिलियोने दूरदर्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरुच्या चार उपग्रहांचा शोध लागला.
- 1789 – जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.
- 1968 – अमेरिकेचे सर्व्हेयर हे यान चंद्राच्या ‘टायको‘ या विवराच्या काठी उतरले.
- 1989 – दुसर्या महायुद्धाच्या काळात जपानचे साम्राट्पद भूषविणार्या मिचिंनोमिय हिरोहितोंचे निधन.