चालू घडामोडी (7 मे 2016)
आता स्थानिक संस्थांना जादा अधिकार :
- केंद्र सरकार आणत असलेल्या नवीन बांधकाम नियमावलीमध्ये बांधकाम विषयक जादा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार असल्याचे केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
- मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित व्यावसायिक सुलभता (ईज ऑफ डुइंग बिझनेस) अंतर्गत इमारत बांधकाम प्रस्ताव मंजुरीबाबतच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
- मानवी हस्तक्षेप कमी केल्याशिवाय नागरिकांना चांगली सेवा देता येणार नाही.
- तसेच त्यामुळे मुंबई महापालिकेने इमारत बांधकाम परवानगीची प्रक्रि या पारदर्शक व सुलभ व्हावी, यासाठी ती संपूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
- मुंबई महापालिकेने इमारत बांधकाम मंजुरीच्या प्रक्रियेत आणलेली सुलभीकरण हे देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे, यामुळे कामामध्ये पारदर्शकता येण्यास मदत होईल.
- बांधकामांसाठी पर्यावरण, वन, ग्राहक संरक्षण, संरक्षण, नागरी वाहतूक मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, उद्योग मंत्रालय आदी विविध विभागाच्या परवानग्या लागतात, त्या एकाच ठिकाणी व ऑनलाईन मिळाव्यात, यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे.
- नव्या नियमावलीमध्ये बांधकाम परवान्याचे काही अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार आहेत, त्यामुळे प्रक्रिया सुलभ होऊन तीस दिवसाच्या आत परवाने मिळतील.
- तसेच अनिधकृत बांधकामास संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरण्याची तरतूद करण्यात येणार आहे.
- महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी महापालिकेने बांधकाम मंजुरीच्या सुलभीकरणात केलेले बदल सांगितले.
स्टार्टअप गुगलने खरेदी केले ‘सिनर्जाइज’ :
- वरुण मल्होत्रा या भारतीय वंशाच्या उद्योजकाने तयार केलेले ‘सिनर्जाइज’ हे टेक्नोलॉजी स्टार्टअप गुगलने खरेदी केले आहे.
- गुगलच्या विविध अॅपचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यासाठी 2013 मध्ये त्यांनी ‘सिनर्जाइज’ तयार केले होते.
- तसेच याबाबत अधिकृतपणे करार झाला असून या माध्यमातून गुगल अॅप्सचे प्रशिक्षण ग्राहकांना दिले जाईल.
- गुगल अॅप्सचा आभासी प्रशिक्षक म्हणून सिनर्जाइज कंपनीच्या सेवेचा वापर केला जाणार आहे.
- आवाज व टेक्स्ट यांच्या आंतर प्रतिसादात्मकतेचा उपयोग यात केला जाणार असून त्यांच्या मदतीने अॅपची निवड करता येईल.
- सिनर्जाइज आता गुगलचा भाग म्हणून काम करील व गुगल अॅप्सचा एकात्मिक भाग म्हणून ते वापरण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल.
लंडनच्या महापौरपदी सादिक खान याची निवड :
- लंडनच्या महापौरपदी सादिक खान यांच्या रुपात पहिल्यांदाच मुस्लिम व्यक्ती महापौर झाली आहे. पाकिस्तानी वंशाचे असलेले सादीक खान यांनी लेबर पक्षाच्या तिकीटावर लंडनच्या महापौरपदाची निवडणूक लढवली होती.
- इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समध्ये महापौर, विधिमंडळ आणि संसदीय निवडणुकांसाठी झालेल्या मतदानात त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कंझर्व्हेटीव्ह पक्षाचे उमेदवार झॅक गोल्डस्मिथ यांचा दारुण पराभव केला.
- कंझर्व्हेटीव्ह यांनी हिंदू आणि शिख मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर केला होता हे विशेष.
- लंडनच्या महापौरपदाची लढाई सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाते.
- माजी मानवाधिकार कार्यकर्ते आणि 2005 पासून लेबर पक्षाचे खासदार असणारे सादीक खान (45) यांनी यंदाच्या निवडणुकीत बाजी मारती आहे.
- माजी पंतप्रधान गॉरडन ब्राऊन यांच्या सरकारमध्ये 2009-10 मध्ये सादीक खान वाहतूक मंत्री होते.
उत्तराखंडमध्ये होणार शक्तिपरीक्षा :
- उत्तराखंडमध्ये मोदी सरकारने लादलेली राष्ट्रपती राजवट अखेर सर्वोच्च न्यायालयाने नाकारली असून (दि.10) रोजी विधानसभेत मुख्यमंत्री हरीश रावत यांना विश्वासदर्शक ठराव मांडून बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
- तसेच या मतदानाचा तपशील बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयाकडे द्यावा लागणार असून नंतर 11 मे रोजी न्यायालय अंतिम निकाल देण्यात येईल.
- विश्वासदर्शक ठरावापुरतेच केवळ दोन तास राज्य विधानसभेचे अधिवेशन होईल, असे आदेशात नमूद करताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या प्रधान सचिवांच्या देखरेखीखाली या संपूर्ण कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यासही सांगितले आहे.
- विश्वासदर्शक ठरावावर मतदान होईल त्या दोन तासांपुरती राज्यातील राष्ट्रपती राजवट स्थगित राहून राज्यपाल हे राज्याचे प्रभारी असतील, असा आदेश न्या. दीपक मिश्रा व न्या. शिवकीर्ती सिंग यांच्या खंडपीठाने दिला.
- तसेच या मतदानाचा निकाल आणि कार्यवाहीचा व्हिडीओ यासह सर्व दस्ताऐवज 11 मे रोजी बंद लिफाप्यात आपल्यासमोर ठेवावेत, असाही आदेश त्यांनी विधानसभेच्या प्रधान सचिवांना दिला.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कूकची विश्वविक्रमाकडे वाटचाल :
- जागतिक क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा फटकावण्याचा विश्वविक्रम मोडण्यास इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कूक सज्ज आहे.
- तसेच हा विश्वविक्रम रचण्यासाठी त्याला अवघ्या 36 धावांची आवश्यकता असून, ‘जर ही किमया केली तर ती आपल्यासाठी विशेष बाब असेल,’ असे मत कूकने व्यक्त केले आहे.
- कूक कसोटी क्रिकेटमध्ये वैयक्तिक 10 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी 36 धावांनी दूर आहे.
- विशेष म्हणजे आगामी 19 मे पासून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तो हा कीर्तिमान नक्की रचू शकतो.
- त्याचबरोबर या विक्रमासह इंग्लंडकडून 10 हजार कसोटी धावा करणार पहिला फलंदाज म्हणूनही कूक ओळखला जाणार आहे.
दिनविशेष :
- रशिया रेडियो दिन.
- 1861 : कविसम्राट रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म.
- 1878 : पुण्यात पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन म्हणजे आताचे साहित्य संमेलन भरविण्यात आले.
- 1880 : डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक; भारतरत्न यांचा जन्म.
- 1907 : मुंबईमध्ये विजेच्या शक्तीवर चालणारी पहिली ट्रॅम सुरु झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा