Current Affairs of 7 October 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2016)
आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी श्रीजेश कर्णधार :
- आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधारपदी पी.आर. श्रीजेश, तर उपकर्णधार म्हणून मनप्रीत सिंह याची निवड करण्यात आली आहे.
- तसेच ही स्पर्धा मलशियातील कुआंटनमध्ये 20 ते 30 ऑक्टोबरदरम्यान होईल.
- आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेसाठी हॉकी इंडियाच्या निवडकर्त्यांनी एस. व्ही. सुनील याच्या जागी मिडफिल्डर मनप्रीत सिंह याची उपकर्णधार म्हणून निवड केली आहे.
- प्रशिक्षक रोलेंट ऑल्टोमन्स म्हणाले, की आशियाई चॅम्पियन्स स्पर्धा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. विश्व रँकिंग पाहता, भारत या किताबाचा प्रबळ दावेदार आहे.
- ऑलिम्पिकनंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.
Must Read (नक्की वाचा):
जीसॅट-18 उपग्रहाचे यशस्वी उड्डाण :
- भारताच्या जीसॅट-18 या उपग्रहाचे (दि.6) फ्रेंच गयाना येथून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. खराब हवामानामुळे या उपग्रहाचे (दि.5) उड्डाण पुढे ढकलण्यात आले होते.
- फ्रान्समधील कैरो येथून या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण करण्यात आले.
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) निर्माण केलेल्या या अत्याधुनिक उपग्रहाचा भारताच्या माहिती दूरसंचार सेवेला उपयोग होणार आहे.
- जीसॅट-18 इस्रोकडून अवकाशात सोडला गेलेला विसावा उपग्रह आहे.
- भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2 वाजता एरियनस्पेसच्या एरियन 5 व्हीएन 231 या प्रक्षेपकाच्या मदतीने जीसॅट-18 चे प्रक्षेपण पार पडले.
- 32 मिनिटांच्या उड्डाणानंतर हा उपग्रह कक्षेत पाठविण्यात आला. त्यानंतर बंगळूरमधील इस्रोच्या मुख्य कार्यालयाने याबाबतची घोषणा केली.
- तसेच या सोबत ऑस्ट्रेलियाचा मस्टर हा उपग्रहही अवकाशात सोडण्यात आला.
- जीसॅट हा उपग्रह सी बॅंड व केयू बॅंड सेवांचा विस्तार करण्यासाठी सोडण्यात येत असून त्याचे वजन 3404 किलो आहे व त्यात 48 संदेशवहन ट्रान्सपॉंडर आहेत. एरियनस्पेससाठी ही 280वी मोहीम होती.
भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी प्रसाद लाड यांची नियुक्ती :
- अलीकडेच राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेले प्रसाद लाड यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- तसेच आमदार संजय कुंटे यांच्याकडे सरचिटणीस पद सोपविण्यात आले.
- मोठ्या संख्येने अन्य पक्षातील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. भाजपात येणा-या सर्वांना सन्मान दिला जाईल.
- आपल्या संघटनेचे जाळे मजबूत करण्याचा विचार सर्वांनी ठेवावा, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यांदा रचला इतिहास :
- डेव्हिड मिलर (नाबाद 118) व क्वांटन डिकॉक (70) यांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या 372 धावांचे आव्हान सहज पूर्ण केले.
- दक्षिण आफ्रिकेने 4 गडी राखून विजय संपादन करून इतिहासातील दुसरा मोठा विजय साकारला.
- किग्समीड मैदानावर दिवस-रात्र एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली.
- डेव्हिड वॉर्नर (117), कर्णधार स्टीव्हन स्मिथ (108) व अॅरॉन फिंच (53) यांच्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत 371 धावांचा लक्ष्य दिले.
- ऑस्ट्रेलियाच्या 371 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या फलंदाजांनीही चौकार, षटकारांची आतषबाजी केली.
- दक्षिण आफ्रिकेने 49.2 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 372 धावा करून एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील दुसरा मोठा विजय संपादन केला.
- तसेच यापूर्वी देखील आफ्रिकेने 12 मार्च 2006 रोजी जोहान्सबर्गमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 434 धावांचा पाठलाग करताना 438 धावा करून विजय मिळविला होता.
ब्रिक्स आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 2016 :
- गोव्यात 5 ते 15 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या चषकाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आले.
- या वेळी केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि ब्रिक्स देशांचे राजदूत उपस्थित होते.
- या स्पर्धेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे.
- तसेच ही स्पर्धा 17 वर्षांखालील गटाची आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा