चालू घडामोडी (8 एप्रिल 2016)
वन रँक-वन पेन्शनची अंमलबजावणी :
- केंद्र शासनाच्या वन रँक-वन पेन्शन या योजनेवर लष्कराकडून युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे.
- लष्करातील 27 लाखांपैकी एकूण 26 लाख निवृत्तिवेतन धारकांना ‘वन रँक-वन पेन्शन’प्रमाणे पेन्शन देण्यास सुरुवात झाली आहे.
- उर्वरित एक लाख निवृत्तिवेतन धारकांच्या पेन्शनमध्ये काही त्रुटी असून, पुढील दोन महिन्यांत त्या पूर्णपणे दूर करण्यात येतील, अशी माहिती लष्कराच्या निवृत्तिवेतन विभागाचे प्रधान नियंत्रक डॉ. जी. डी. पुंगळे यांनी दिली.
- पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन अदालतीसाठी डॉ. पुंगळे उपस्थित होते.
- मागील 6 महिन्यांपासून अलाहाबाद येथे लष्कराचे 50 लेखनिक ‘वन रँक-वन पेन्शन’संदर्भात काम करीत आहेत.
- शासनाने योजना जाहीर केल्यानंतर आत्तापर्यंत एकूण निवृत्तिवेतनाच्या 90 टक्क्यांहून अधिक लाभार्थ्यांना ‘वन रँक-वन पेन्शन’प्रमाणे पेन्शन जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
अणुसुरक्षा शिखर परिषदच्या उपाययोजना जाहीर :
- अमेरिकेत झालेल्या अणुसुरक्षा शिखर बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अणुसुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचे सांगताना काही उपाययोजना जाहीर केल्या.
- तसेच पन्नास देशांचे प्रतिनिधी या शिखर बैठकीस उपस्थित होते.
- अण्वस्त्रांची तस्करी रोखणे, आण्विक दहशतवाद टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे यासारख्या उपाययोजनांचा त्यात समावेश आहे.
- अल कायदा व आयसिसच्या दहशतवाद्यांना अण्वस्त्रे मिळाली तर ती ते वापरतील अशी भीती अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी या बैठकीत व्यक्त केली.
आशियातील शक्तिशाली महिलांमध्ये नीता अंबानीची निवड :
- रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक नीता अंबानी यांची यावर्षीच्या फोर्ब्जच्या आशियातील शक्तिशाली महिलांमध्ये निवड झाली आहे.
- तसेच या मासिकाच्या मुखपृष्ठावर नीता अंबानी यांचे छायाचित्र आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह आठ भारतीय महिलांनीही फोर्ब्जच्या आशियातील शक्तिशाली 50 महिला व्यावसायिकांच्या यादीत (आशिया फिफ्टी पॉवर बिझनेस वुमेन 2016) स्थान मिळविले आहे.
- लिंगभेद व असमान संधी असतानाही व्यावसायिक जगामध्ये आपले स्थान मिळविणाऱ्या महिलांची नोंद फोर्ब्ज घेत असते.
- फोर्ब्जने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये नीता अंबानी, अरूंधती भट्टाचार्य यांच्याबरोबरच डाटा अॅनालिटिक्स सर्व्हिसेसच्या अंबिगा धीरज, वेलस्पन इंडियाच्या दीपाली गोयंका, ल्युपिनच्या वीनिता गुप्ता यांचा समावेश आहे.
- याशिवाय भारतामधील आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, व्हीएलसीसीच्या उपाध्यक्ष वंदना लुथरा व बायोकॉनच्या अध्यक्षा किरण मझुमदार-शॉ यांनीही या यादीत स्थान पटकावले आहे.
प्राप्तिकर खात्याची ऑनलाइन गणकयंत्र सुविधा :
- 2016-17 या वर्षांसाठी आपला प्राप्तीकर किती आहे हे मोजण्यासाठी प्राप्तिकर खात्याने ऑनलाइन गणकयंत्राची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- टॅक्स कॅलक्युलेटर हा ऑनलाइन प्रोग्रॅम असून तो प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- तसेच त्याच्या मदतीने विवरणपत्र भरताना नेमका प्राप्तिकर किती हे समजणार आहे, करदायित्व समजण्यासाठी ही सोय केली आहे.
- मूलभूत माहिती व आकडे भरल्यानंतर तुम्हाला कराची रक्कम कळू शकेल.
- व्यक्तिगत पगारदार, एकत्र कुटुंब व इतर उत्पन्न स्रोत असलेल्या करदात्यांसाठी आयटीआर 1 अर्ज भरायचा आहे तर विभक्त हिंदू कुटुंब व व्यक्तींसाठी आयटीआर 4 हा अर्ज भरायचा आहे.
- या वर्षी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अधिसूचना जारी केली असून त्यानुसार 30 मार्चला नवीन अर्ज अधिसूचित केले आहेत व ते 31 जुलैपर्यंत सादर करता येणार आहेत.
- ई फायलिंग व्हॉल्ट :-
- करदात्यांना आपले ई-फायलिंग अकाउंट सुरक्षित राखता यावे यासाठी प्राप्तीकर खात्याने ई फायलिंग व्हॉल्ट ही नवी सुविधा जारी केली आहे.
- ई-फायलिंग अकाउंटवर लॉग ऑन केल्यानंतर करदात्याने ई फायलिंग व्हॉल्ट-हायर सिक्युरिटी सिलेक्ट केल्यास त्यापुढची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सुविधेचा लाभ घेता येईल.
- ही सुविधा घेतल्यानंतर करदात्याने यापूर्वी जरी युजर आयडी आणि पासवर्ड कोणाला दिला असला तरीही इतर कोणालाही लॉगींग करण्यापासून करदाता रोखू शकतो.
- केवळ युजर आयडी आणि पासवर्ड पेक्षा ही सुविधा सर्वोच्च सुरक्षा आहे.
‘आयआयटी’ च्या शैक्षणिक शुल्कात वाढ :
- भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) शिकणे आता आणखी महाग झाले आहे.
- पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेश शुल्कामध्ये तब्बल 122 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, हे शुल्क 90 हजारांवरून 2 लाख रुपये करण्यात आले आहे.
- पुढील शैक्षणिक सत्रापासून ही वाढ लागू करण्यात येईल, अनुसूचित जाती, जमाती, अपंग आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गटांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता येईल.
- तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 5 लाखांपेक्षा कमी असेल अशांचेही दोनतृतीयांश एवढे शुल्क माफ करण्यात आले आहे.
- कोणत्याच श्रेणीमध्ये न येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यासंबंधीची अधिसूचनाही लवकरच जारी करण्यात येईल.
- दरम्यान, सध्या ‘आयआयटी’मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या शुल्कवाढीचा कोणताही फटका बसणार नसून, केवळ नव्याने प्रवेश घेणाऱ्यांसाठी ही वाढ लागू असेल.
दिनविशेष :
- जपानमध्ये बुद्धाचा जन्मदिवस.
- जागतिक रोमा (रोमनियन) दिवस.
- 1950 : भारत आणि पाकिस्तान यांच्या लियाकत-नेहरू करारावर स्वाक्षर्या झाल्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा