Current Affairs of 8 April 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 एप्रिल 2018)
पाकिस्तानात ‘GEO न्यूज’ वर बंदी :
- पाकिस्तानच्या मुख्य न्यूज चॅनल्सपैकी एक असलेल्या ‘GEO न्यूज’ला काही दिवसांपासून ‘ब्लॅक आउट’चा सामना करावा लागत आहे.
- सरकार आणि सैन्याच्या विरोधात बातम्या दाखवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
- तसेच पाकिस्तानातील जवळपास 80 टक्के परिसरात चॅनलचं प्रसारण बंद करण्यात आलं आहे अशी कबुली नेटवर्कच्या मुख्य संपादकांनी द न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे.
Must Read (नक्की वाचा):
नव्या रक्तचाचणीमुळे स्मृतिभ्रंशाचे निदान लवकर :
- संशोधकांनी नवीन रक्तचाचणी विकसित केली असून यामुळे स्मृतिभ्रंश असणाऱ्या रुग्णांमध्ये या आजाराचे निदान लवकर होत असल्याचे आढळून आले आहे.
- या चाचणीमुळे या संदर्भातील नवीन औषधांच्या निर्मितीसाठी चालना मिळण्याची शक्यता असल्याचे जर्मनीतील ऱ्हुर विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले आहे.
- स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांच्या मेंदूमध्ये लक्षणांच्या सुरुवातीला अमायलॉइड बीटाचा थर जमा होण्यास सुरुवात होते. रक्ताच्या चाचणीमध्ये इम्युनो इन्फ्रारेड सेन्सर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमायलॉइड बीटा थराचा आकार आणि त्याची रचना समजून घेतली जाते. या चाचणीमुळे स्मृतिभ्रंश आजाराचे निदान लवकर होत असल्याचे दिसून येत आहे.
- निरोगी व्यक्तीच्या मेंदूतील अमायलॉइड बीटाचा थर पातळ असतो, तर स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीच्या मेंदूमधील अमायलॉइड बीटाचा थर जाड आणि चिकट असतो.
पेसच्या विश्वविक्रमासह भारताचा विजय :
- एकेरीचे पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतर भारतीय संघ डेव्हिस चषक टेनिस लढतीत पराभवाच्या दिशेने होता. मात्र लिएण्डर पेसने धडाकेबाज खेळी करत विश्वविक्रम केला आहे.
- भारतीय खेळाडूंनी एकेरीचे परतीचे दोन्ही सामने जिंकले आणि चीनवर 3-2 असा विजय नोंदवला आहे.
- तसेच पेसने रोहन बोपण्णाच्या साथीत दुहेरीत माओ झिन गोंग व झेई झांग यांच्यावर 5-7, 7-6 (7-5), 7-6 (7-3) अशी मात केली आहे.
- हा सामना जिंकून पेसने स्पर्धेतील दुहेरीत सर्वाधिक 43 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात मनु भाकेरला सुवर्णपदक :
- राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या नेमबाजीमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या अवघ्या 16 वर्षांच्या मनू भाकरने आपल्याच देशाची अनुभवी नेमबाज हीना सिद्धू हिला मात देत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
- तर हीनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. या प्रकारात ऑस्ट्रेलियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
- स्पर्धेतील भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे. नेमबाजीतील या दोन पदकांच्या जोरावर भारताची स्पर्धेतील पदकांची संख्या 9 वर पोहोचली आहे.
- मनू भाकरने हिना सिद्धूला मात दिली आणि 240.9 गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला. तर 243 गुणांची कमाई करणाऱ्या हिनाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात पूनम यादवला सुवर्णपदक :
- राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला वेटलिफ्टिंगच्या 69 किलो गटात भारतच्या पूनम यादवने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
- या स्पर्धेतील आणि भारोत्तलनामधील भारताचे हे एकूण पाचवे सुवर्णपदक आहे.
- महिलांच्या वेटलिफ्टिंगच्या 69 किलो वजनी गटात भारताच्या पूनम यादव हिने क्लीन अॅण्ड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात 122 किलो वजन उचलले. त्याआधी दुसऱ्या प्रयत्नात 122 किलो वजन उचलण्यात तिला अपयश आले होते. तर पूनमने एकूण 222 किलो भार उचलला होता.
- या प्रकारात इंग्लंडच्या साराह डेव्हिसला रौप्य तर फिजीच्या अपोलोनिया वैवानी हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
नेपाळ-भारत यांच्यात 6 करार :
- भारत-नेपाळमध्ये संरक्षण, व्यापाराच्या क्षेत्रात सहकार्य वाढीवर सहमती झाली आहे. त्यात व्यापार, संरक्षण, रेल्वे, पाणी संबंधी सहा करारांवर स्वाक्षरी झाली आहे.
- भारत-नेपाळ यांच्यात संपर्क वाढवण्यावर सहमती झाली आहे. त्यात तीन मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. रक्सोलहून काठमांडू दरम्यान रेल् वे मार्ग, नद्यांच्या माध्यमातून जलमार्ग संपर्क व नेपाळमध्ये कृषी क्षेत्रात सहकार्य व भागीदारी केली जाणार आहे. तसेच रक्सोल ते काठमांडू विजेवरील रेल्वे रुळ अंथरण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- 1911 मध्ये डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.
- आचार्य विनोबा भावे यांनी 1921 मध्ये ‘पवनार’ आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.
- भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील 1929 मध्ये सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
- 1950 मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.
- मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात 1993 मध्ये सामील झाले.
- 1857च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू झाला.