Current Affairs of 8 December 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 डिसेंबर 2015)
फेसबुक आणि व्हॉट्सऍप भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरले :
- सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबुक आणि मोबाईलवरील लोकप्रिय व्हॉट्सऍप हे भारतात यंदा सर्वाधिक लोकप्रिय ठरले असल्याची माहिती एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे.
- मोबाईलवर विविध ऍप्स वापरणाऱ्यांमध्ये “ट्रू कॉलर” व “यूसी ब्राउजर”चाही टॉप 5 मध्ये समावेश आहे.
- विविध संकेतस्थळांवरून 20 हजार ऍप्स डाउनलोड केली जातात. भारतात सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या ऍप्समध्ये एमएक्स प्लेअर, फ्लिपकार्ट, कॅण्डी क्रश, ऍपलॉक व नोकरी.कॉमचा समावेश आहे.
- मोबाईलच्या माध्यमातून विविध ऍप्सचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
- इंग्रजी न येणाऱ्यांसाठी ऍप्स उपलब्ध असल्यामुळे त्यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, अशी माहिती वुईचऍपचे मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल चावला यांनी दिली.
Must Read (नक्की वाचा):
‘आयसीसी’च्या कसोटी क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर :
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये 3-0 असा विजय मिळवित भारताने ‘आयसीसी’च्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
- या विजयामुळे भारताचे आता 111 गुण झाले असून दक्षिण आफ्रिका अजूनही अव्वल स्थानी कायम आहे.
- एकदिवसीय क्रमवारीमध्येही भारत दुसर्या स्थानी आहे. ट्वेंटी-20 क्रिकेट क्रमवारीमध्ये मात्र भारत सातव्या क्रमांकावर आहे.
‘आयसीसी’ची कसोटी क्रमवारी :
1) दक्षिण आफ्रिका : 114 गुण
2) भारत : 110 गुण
3) ऑस्ट्रेलिया : 109 गुण
4) पाकिस्तान : 106 गुण
5) इंग्लंड : 99 गुण
6) न्यूझीलंड : 95 गुण
7) श्रीलंका : 94 गुण
8) वेस्ट इंडीज : 76 गुण
9) बांगलादेश : 47 गुण
‘आयसीसी’ची एकदिवसीय क्रमवारी :
1) ऑस्ट्रेलिया : 127 गुण
2) भारत : 114 गुण
3) दक्षिण आफ्रिका : 112 गुण
4) न्यूझीलंड : 109 गुण
5) श्रीलंका : 105 गुण
6) इंग्लंड : 101 गुण
7) बांगलादेश : 97 गुण
8) पाकिस्तान : 87 गुण
9) वेस्ट इंडीज : 86 गुण
10) झिंबाब्वे : 46 गुण
11) आयर्लंड : 46 गुण
12) अफगाणिस्तान : 45 गुण
‘आयसीसी’ची ट्वेंटी-20 क्रमवारी
1) श्रीलंका : 125 गुण
2) वेस्ट इंडीज : 118 गुण
3) ऑस्ट्रेलिया : 118 गुण
4) इंग्लंड : 117 गुण
5) दक्षिण आफ्रिका : 115 गुण
6) पाकिस्तान : 114 गुण
7) भारत : 110 गुण
8) न्यूझीलंड : 108
9) अफगाणिस्तान : 77 गुण
10) बांगलादेश : 69 गुण
11) स्कॉटलंड : 66 गुण
12) हॉंगकॉंग : 61 गुण
13) नेदरलॅंड्स : 61 गुण
14) झिंबाब्वे : 53 गुण
15) आयर्लंड : 42 गुण
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज पाकिस्तानला रवाना :
- इस्लामाबादेतील “हर्ट ऑफ एशिया” परिषदेला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज पाकिस्तानला रवाना होत आहेत. या दौऱ्यात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सरताझ अझिझ यांच्याशी स्वराज चर्चा करणार आहेत.
- या वेळी भारत आणि पाकिस्तानदरम्यानची चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.
- भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या काल बॅंकॉकमध्ये झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर स्वराज यांच्या पाकिस्तानच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
- अफगाणिस्तानसंबंधी आयोजित करण्यात आलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 5व्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी स्वराज आज पाकिस्तानला रवाना होत आहेत.
- ही परिषद 9 डिसेंबर रोजी इस्लामाबाद येथे होत आहे.
लोकसभेच्या ओबीसी कल्याण समितीच्या बैठकीत मागणी :
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त हिवाळी अधिवेशनात दोन दिवस विशेष चर्चा घेणाऱ्या केंद्र सरकारवर महात्मा फुलेंच्या स्मरणार्थदेखील विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी ओबीसी संवर्गातील खासदारांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
- गेल्या आठवडय़ात झालेल्या लोकसभेच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) कल्याण समितीच्या बैठकीत याच मुद्दय़ावर सर्व सदस्यांचे एकमत झाले. समितीतील एका सदस्याने महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव करीत सरकार ओबीसींच्या हिताकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला.
- डॉ. आंबेडकरांचे कार्य महान आहे, परंतु त्यांचे गुरू महात्मा फुले हेच होते.
- त्यांच्यापासून डॉ. आंबेडकरांनी प्रेरणा घेतली होती. महात्मा फुले ओबीसी नेते आहेत. त्यांच्या कार्य व कर्तृत्वाचा आढावा घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. अधिवेशन केव्हा घ्यावे, यावर मात्र शिक्कामोर्तब होऊ शकले नाही, असा दावा समितीतील एका सदस्य खासदाराने केला.
दिनविशेष :
- बल्गेरिया विद्यार्थी दिन (स्टुदेन्स्की प्राझ्निक)
- पनामा मातृ दिन
- रोमेनिया संविधान दिन
- जागतिक मतिमंद पुनर्वसन दिन
- 1976 : ईगल्सनी हॉटेल कॅलिफोर्निया प्रकाशित केले.
- 1985 : सार्क परिषदेची स्थापना.