Current Affairs (चालू घडामोडी)

Current Affairs of 8 July 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 जुलै 2018)

नीट, जेईई आता वर्षांतून दोनदा :

  • संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई), राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) आता वर्षांतून दोन वेळा देता येणार आहेत.
  • यासह सर्व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे (एनटीए) घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
  • तसेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा (एनईटी) ही या स्वतंत्र संस्थेमार्फत घेतली जाणारी पहिली परीक्षा असेल. ही परीक्षा डिसेंबरमध्ये होईल.
  • याआधी ही परीक्षा विद्यापीठ ‘जेईई’ (मुख्य) ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिल, तर ‘नीट’ फेब्रुवारी आणि मे अशी वर्षांतून दोन वेळा घेण्यात येणार आहे.
  • त्याशिवाय व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठीची सीमॅट, औषधनिर्माण पदवी कलचाचणी (जीपॅट) या परीक्षाही याच संस्थेमार्फत घेतल्या जाणार आहेत.
  • मात्र, जेईई अ‍ॅडव्हान्सची प्रक्रिया आयआयटीकडेच ठेवण्यात आली आहे.

राणी रामपालकडे महिला हॉकी संघाचं नेतृत्व :

  • आशियाई खेळांसाठी निवडण्यात आलेला भारताचा महिला हॉकी संघ आगामी आशियाई खेळांसाठी हॉकी इंडियाने महिला संघाची घोषणा केलेली आहे.
  • तर 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान जकार्ता येथे आशियाई खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
  • तसेच राणी रामपालकडे महिला हॉकी संघाचं नेतृत्व असणार आहे.तर सविता हि उपकर्णधार असणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 जुलै 2018)

रिलायन्सच्या अध्यक्षपदी पुन्हा मुकेश अंबानी :

  • रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी शेअरधारकांनी मुकेश अंबानी यांना पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे.

    Reliance JIO

  • तर अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मंडळावर 1977 पासून आहेत.
  • त्यांना धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर जुलै 2002 मध्ये कंपनीचे अध्यक्ष करण्यात आले होते.
  • मुंबई येथे 5 जुलैला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • तसेच ठरावानुसार मुकेश अंबानी यांना वार्षिक 4.17 कोटी वेतन व 59 लाख रुपयांचे इतर भत्ते देण्यात येतील.
  • तर यात निवृत्तीच्या लाभांचा समावेश नाही. निव्वळ नफ्याच्या आधारे मुकेश हे बोनसला पात्र असतील.

गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांचे मोबाईल जप्त करा:

  • उत्तराखंडमध्ये गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचे मोबाईल किमान एक दिवसासाठी तरी जप्त करा, असे निर्देश उत्तराखंड हायकोर्टाने दिले आहेत.
  • तसेच राज्यातील सर्व रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडीटही करावे, असे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत.
  • उत्तराखंड हायकोर्टाचे न्या. राजीव शर्मा यांनी रस्ते सुरक्षासंदर्भात राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.
  • वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे वाहनचालक हे दुसऱ्यांचा जीव धोक्यात हायकोर्टाने गेल्या महिन्यातही गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांकडून 5 हजार रुपये  दंड आकारण्याचे निर्देश दिले होते.

गणेशोत्सव मंडळांना मिळणार ‘ऑनलाइन’ परवानगी :

  • मुंबईत या वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन पद्धतीने मंडपाची परवानगी मिळणार आहे.
  • मंडपाचा आकार, रस्ते आदींबाबत उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषानुसार या परवानगी देण्यात येणार आहेत.
  • मात्र, ही परवानगी गणेशोत्सवाच्या किमान एक महिना आधी मिळावी, अशी मागणी मंडळांनी लावून धरली आहे.
  • मंडप उभारण्याच्या परवानगीसाठी 15 जुलैपासून सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • त्यानंतर, वाहतूक व स्थानिक पोलिसांची ना हरकत मिळताच मंडळांना ही परवानगी देण्यात येणार आहे.

साहित्याचे पर्यायी नोबेल :

  • नोबेल पुरस्कार देणाऱ्या ‘रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी’ने यंदाच्या नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा बेमुदत पुढे ढकलल्यानंतर स्वीडनमधील 100 हून अधिक प्रमुख बुद्धिवंतांनी एकत्र  येऊन पर्यायी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
  • रॉयल स्वीडिश अकादमीच्या ’पक्षपात, उद्दामपणा व लैंगिक व्यभिचारा’चा निषेध करत 107 मान्यवर लेखक, प्रकाशक, कलावंत व पत्रकारांनी एकत्र येऊन यासाठी ‘ न्यू अ‍ॅकॉडमी’ची स्थापना केल्याचे एका संयुक्त निवेदनाव्दारे जाहीर केले आहे.
  • साहित्यासाठीचा पर्यायी नोबेल पुरस्कार 10 लाख क्रोनर (सुमारे 1,30 लाख डॉलर) असेल. यासाठी लोकवर्गणी व देणग्यांमधून निधी उभा केला जाईल.
  • एरवी नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा होते तेव्हाच म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी या पर्यायी पुरस्काराचा विजेता जाहीर केला जाईल व ज्या दिवशी सर्व नोबेल पुरस्कारांचे स्वीडनच्या राजांच्या हस्ते वितरण होते दिवशी (10 डिसेंबर) हा पुरस्कारही वेगवेगळ्या कार्यक्रमात प्रदान केला जाईल.

दिनविशेष :

  • 8 जुलै 1497 ला वास्को द गामा भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले.
  • 8 जुलै 1889 मध्ये द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 8 जुलै 1910 ला मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
  • रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी 8 जुलै 2006 मध्ये चलनात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 जुलै 2018)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago