Current Affairs of 8 June 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 जून 2017)
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर :
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची निवड झाली आहे.
- 14 जून रोजी होणाऱ्या नाट्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.
- नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दरवर्षी नाट्य परिषदेतर्फे 14 जून रोजी पुरस्कार प्रदान केले जातात.
Must Read (नक्की वाचा):
राष्ट्रपती निवडणुकीचे मतदान 17 जुलै रोजी :
- भारतीय प्रजासत्ताकाचे 15वे राष्ट्रपती निवडण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार या निवडणुकीचे मतदान 17 जुलै रोजी होईल व गरज पडल्यास 20 जुलै रोजी मतमोजणी होईल.
- विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत 24 जुलै रोजी संपत आहे. त्याआधी एक आठवडा किंवा चार दिवस आधी मुखर्जी यांचा उत्तराधिकारी म्हणून देशाच्या या सर्वोच्चपदावर पुढील पाच वर्षे कोण बसेल हे स्पष्ट होईल. एकाहून जास्त उमेदवार रिंगणात नसतील, तर 1 जुलै रोजीच नव्या राष्ट्रपतीचे नाव समोर येईल.
- आयोगाने या निवडणुकीसाठी लोकसभा सचिवालयाचे महासचिव अनूप मिश्रा यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
- तसेच महाराष्ट्रात राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. ए.एन. कळसे व उपसचिव आर.जे. कुडतरकर हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
कोकण आयुक्तपदी जगदीश पाटील यांची नियुक्ती :
- कोकण विभागीय महसूल आयुक्तपदी डॉ. जगदीश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. 7 जून रोजी त्यांनी हा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते.
- डॉ. पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास,सोलापूर जिल्हाधिकारी, राज्य पर्यटन विकास महामंडळ, बेस्टचे महाव्यवस्थापक अशा विविध पदांवर काम केले आहे.
- 1991 मध्ये केलेल्या त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कोकण विभागात पर्यटन आणि फलोत्पादनाच्या क्षेत्रात विशेष काम करण्यास वाव असल्याचे सांगितले.
‘राष्ट्रीय स्वयंरोजगार’ महाराष्ट्र व्दितीय :
- राष्ट्रीय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (रेसेटस्) च्या अभियानात बेरोजगार युवक युवतींसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम उल्लेखनीयरित्या व प्रभावीपणे राबवल्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामविकास व पंचायतराजमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नत्ती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
- तसेच यावेळी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे प्रादेशिक संचालक सुनिल कस्तुरे, पोतदार व ग्रामीण उन्नत्ती अभियानाचे संचालक जॉर्ज बर्नाड शॉ उपस्थित होते.
दिनविशेष :
- 8 जून हा जागतिक समुद्र दिन म्हणून पाळला जातो.
- मराठी तत्वचिंतक व समीक्षक ‘दिनकर केशव बेडेकर’ यांचा 8 जून 1910 रोजी जन्म झाला.
- 8 जून 1915 रोजी लोकमान्य टिळकांनी मंडाले तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून पुर्ण केला.
- भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान एअर-इंडियाची हवाई सेवा 8 जून 1948 रोजी सुरु झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा