चालू घडामोडी (8 मे 2017)
भारतीय लष्कर सेवा उच्च दर्जाची :
- देशातील इतर प्रशासकीय सेवांपेक्षा लष्कर सेवा उच्च दर्जाची आहे. त्यामुळे लष्करातील सेवेकडे विशेष सेवा म्हणून पाहिले पाहिजे.
- प्रशासकीय सेवेतील पदोन्नतीचे नियम लष्कर सेवेसाठी लावणे योग्य होणार नाही. त्यातून आपण स्वत:च आपला दर्जा कमी करून घेतल्या सारखे होईल, असे देशाचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले.
- वॉर वाउंडेड फाऊंडेशनच्या वतीने आर्म फोर्स मेडिकल कॉलेज (एएफएमसी) येथे आयोजित दिव्यांग सैनिकांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बिपिन रावत बोलत होते.
- कार्यक्रमास फाऊंडेशनचे अध्यक्ष निवृत्त ले.जनरल विजय ओबेरॉय, सदन कमांडचे ले.जनरल पीएम हॅरिझ यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षाला बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद :
- पुण्याची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणेने सांगली बुद्धिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर स्मृती आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
- अंतिम फेरीत आकांक्षाने साडेआठ गुणांची कमाई करीत विजेतेपद आपल्या नावे केले. तिला रोख रक्कम 51 हजार व चंद्राबाई आरवाडे फिरती रौप्यढाल प्रदान करण्यात आली. मुंबईच्या विश्वा शहाला मात्र आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
हिंदुजा बंधू ठरले ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती :
- भारतीय वंशाच्या हिंदुजा बंधूंनी ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान मिळवला आहे.
- हिंदुजा समूहाची संपत्ती 16.2 अब्ज पौंड असून मागील वर्षापेक्षा यंदा त्यांच्या संपत्तीमध्ये 3.2 अब्ज डॉलरची वाढ नोंदविण्यात आली आहे.
- हिंदुजा बंधूंसह ब्रिटनमधील 1000 प्रमुख अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये 40 अन्य भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे.
- ‘द संडे टाइम्स रिच लिस्ट’ने ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. मागील वर्षी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा ब्रिटनमधील अब्जाधीशांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे ‘द संडे टाइम्स रिच लिस्ट’मध्ये नमूद करण्यात आले आहे.
इमॅन्युअल माक्रोन फ्रान्सचे नवे राष्ट्रपती :
- फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इमॅन्युअल माक्रोन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
-
- 39 वर्षीय माक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांच्यावर विजय मिळवला.
-
- तसेच या निवडणुकील माक्रोन यांना सुमारे 80 लाख 50 हजार 245 म्हणजेच एकूण मतदानापैकी 61.3 टक्के मते मिळाली आहेत.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुलींना हवाईदलात समान संधी :
- राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) ‘एअर विंग’मधून ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्या मुलींनाही आता हवाईदलाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा न देता थेट मुलाखतीला जाण्याचे दरवाजे खुले झाले आहेत.
- तिन्ही सैन्यदलांमधील भरतीसाठी ‘कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन’ (सीडीएस) ही परीक्षा घेतली जाते. ही भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, ‘स्टाफ सिलेक्शन बोर्डा’कडून घेतली जाणारी तोंडी मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी अशी तीन टप्प्यांमध्यो होते.
- ‘एनसीसी’मध्ये सहभागी होऊन ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्या उमेदवारांना यात लेखी परीक्षा न देता थेट तोंडी मुलाखतीला बोलाविले जाते. ही सवलत आतापर्यंत फक्त पुरुष उमेदवारांनाच मिळत असे.
- परंतु हवाईदलाने आता ही सवलत महिलांनाही देण्याचे ठरविल्याने ‘एनसीसी’च्या ‘एअर विंग’मधून ‘सी’ प्रमाणपत्र मिळविलेल्या मुलीही यापुढे हवाईदलातील भरतीसाठी ‘स्टाफ सिलेक्शन बोर्डा’च्या तोंडी मुलाखतीसाठी थेट बोलाविल्या जातील.
दिनविशेष :
- 8 मे हा जागतिक रेडक्रॉस दिवस आहे.
- 8 मे 1886 मध्ये डॉ. जॉन स्टाइथ पेम्बरटनने कोका कोला प्रथमतः तयार केले.
- भारतीय तत्त्वज्ञानी ‘स्वामी चिन्मयानंद’ यांचा जन्म 8 मे 1916 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा