Current Affairs of 8 November 2015 For MPSC Exams

 चालू घडामोडी (8 नोव्हेंबर 2015)

जम्मू-काश्‍मीरसाठी 80 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा :

  • नव्या काश्‍मिरच्या पुनर्निर्माणाची सुरवात असल्याचे आणि हा शेवट नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्‍मीरसाठी तब्बल 80 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली.
  • गेल्या वर्षी खोऱ्यातील पुराच्या आपत्तीनंतर राज्याला भेट दिली होती.
  • दरम्यान, या दौऱ्यात मोदींच्या हस्ते उधमपूर-रामबान तसेच रामबान-बानिहाल या 4 हजार 306 कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गांचा कोनशिला समारंभ झाला.
  • त्याचप्रमाणे त्यांनी रामबान जिल्ह्यातील वीज प्रकल्पाचे उद्‌घाटनही केले.
  • जम्मू-काश्‍मीरला देण्यात आलेल्या 80 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधून पश्‍चिम पाकिस्तानातून आलेल्यांचे आणि काश्‍मिरी पंडितांचे पुनर्वसन होणार.
  • त्याशिवाय भारतीय राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्या स्थापन करणार असून, यातून 4 हजार युवकांना रोजगार मिळेल.

“वन रॅंक वन पेन्शन” योजनेची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना जारी :

  • बहुप्रतिक्षित “वन रॅंक वन पेन्शन” योजनेची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने जारी केली आहे.
  • निवृत्त सैनिकांसाठीच्या या योजनेची अंमलबजावणी दिवाळीपूर्वी करण्याची घोषणा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली होती.
  • केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वीच ही योजना जाहीर केली होती.
  • मात्र, सरकारने जाहीर केलेल्या योजनेमध्ये अद्यापही त्रुटी असल्याचे कारण सांगत काही निवृत्त सैनिकांनी अद्यापही आंदोलन सुरूच ठेवले आहे.

भारत चीनपेक्षा कमी भ्रष्ट देश :

  • अठरा वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारत चीनपेक्षा कमी भ्रष्ट देश ठरला आहे.
  • भ्रष्टाचारविरोधी “ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल” या संस्थेने केलेल्या वार्षिक पाहणीतून हे स्पष्ट झाले.
  • या संस्थेने जगातील 175 देशांमध्ये पाहणी करून क्रमवारी तयार केली होती.
  • त्यानुसार भारत 85व्या स्थानी असून, चीनला शंभरावे स्थान मिळाले आहे.
  • या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या भ्रष्टाचार पूर्वानुमान निर्देशांकानुसार डेन्मार्क (92) हा सर्वात कमी भ्रष्ट देश असून, सोमालिया आणि उत्तर कोरिया सर्वांत भ्रष्ट देश ठरले आहेत.

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

  • भारतीय लष्कराने आज जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी चाचणी घेतली.
  • या चाचणीमुळे पुन्हा एकदा ब्राह्मोसची मारक क्षमता स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
  • मोबाईल ऍटोनॉमस लॉंचरच्या (माल) माध्यमातून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले.
  • या क्षेपणास्त्राने लष्कराने निश्‍चित केलेली सर्व उद्दिष्ट्ये प्राप्त केली आहेत.
  • सध्या भारतीय लष्कराच्या शस्त्रागारामध्ये तीन ब्राह्मोस क्षेपणास्त्रे असून ती सर्व ब्लॉक -3 श्रेणीमधील आहेत.
  • त्यांची या वर्षी 8 आणि 9 मे रोजी चाचणी घेण्यात आली होती.
  • जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र 2007 मध्ये भारतीय लष्करात दाखल झाले होते.

दिनविशेष :

  • 1919 : पु. ल. देशपांडे, मराठी साहित्यिक यांचा जन्म.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago