चालू घडामोडी (8 सप्टेंबर 2015)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उद्योगपतींशी चर्चा करणार :
- जागतिक आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उद्योगपतींशी चर्चा करणार असून, यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी, टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यासह बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व अर्थतज्ज्ञांचा समावेश आहे.
- चीनच्या अर्थव्यवस्थेची चिंताजनक स्थिती आणि अमेरिकी मध्यवर्ती बॅंकेकडून व्याज दरवाढीची शक्यता या पार्श्वभूमीवर मोदी आणि उद्योगपती यांची बैठक होत आहे.
- या बैठकीला उद्योगपती, बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ असे 27 जण उपस्थित असणार आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील नजीकच्या काळातील घडामोडी आणि भारतासाठीच्या संधी यावर बैठकीत चर्चा होईल.
- याआधी उद्योग क्षेत्रातील संघटनांशी मोदी यांनी 30 जून रोजी चर्चा केली होती.
स्पेनच्या राबर्टो बातिस्ता विजय :
- जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राबर्टो बातिस्ता आगुटविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवून सलग 26 व्या वेळी ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
- जोकोविचने या लढतीत 6-3, 6-4, 6-3 ने विजय मिळविला.
- उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचला फेलिसियानो लोपेजच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
- जोकोविचने यूएस ओपनमध्ये सलग नवव्यांदा अंतिम 8 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.
- नववे मानांकनप्राप्त क्रोएशियाच्या सिलिचचा या स्पर्धेतील हा सलग 11 वा विजय ठरला.
- त्याने गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये कारकिर्दीतील पहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले होते.
सेरेना आणि व्हीनस विल्यम्स विजयी :
- सेरेना आणि व्हीनस विल्यम्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवित महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
- तसेच कॅनडाच्या बुचार्डने दुखापतीमुळे चौथ्या फेरीच्या लढतीतून माघार घेतली.
- भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची तिची सहकारी मार्टिना हिंगीस यांनी तिसऱ्या फेरीच्या लढतीत सहज विजयाची नोंद करताना महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानच्या दौऱ्यावर :
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोयासान विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच इतर विविध औद्योगिक- आर्थिक विषयक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज जपानच्या दौऱ्यावर रवाना होत आहे.
- या शिष्टमंडळात उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांचा समावेश आहे.
- तसेच कोयासान आणि डॉ. आंबेडकर विद्यापीठात करार होणार आहे.
- मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) आणि मेट्रो प्रकल्पांसाठी जपानच्या व्यापार आणि आर्थिक व्यवहारविषयक विभागाशी राज्य शासनाचा करार होणे अपेक्षित आहे.
“एफटीआयआय”च्या अध्यक्षपदी राजकुमार हिरानी यांची नियुक्ती होण्याची शक्यता :
- विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे पुण्यातील “एफटीआयआय”च्या अध्यक्षपदी चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- गजेंद्र चौहान यांना अध्यक्षपदावरून हटवण्याच्या मागणीसाठी “एफटीआयआय”च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुमारे 100 दिवसांपासून सुरू आहे.
- देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने अखेरीस नमते घेऊन चौहान यांना हटवण्याचा निर्णय घेतला असून हिरानी यांच्यासमोर अध्यक्षपदाचा प्रस्ताव ठेवला आहे.
‘गुगल इंडिया’कडून तंत्रज्ञानयुक्त शिक्षणातील योगदानासाठी शिक्षकांची दखल :
- शिक्षक दिनी यंदा ‘गुगल इंडिया’कडून तंत्रज्ञानयुक्त शिक्षणातील योगदानासाठी चार शिक्षकांची दखल घेण्यात आली आहे.
- त्यामध्ये साताऱ्यातील प्रा. दीपक ताटपुजे तसेच म्हसवड येथील बालाजी जाधव या दोन शिक्षकांचा समावेश आहे.
- सातारा येथील प्रा. दीपक ताटपुजे हे गेल्या 30 वर्षांपासून सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयात ग्रामीण विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचे धडे देत आहेत.
- तसेच म्हसवड येथील बालाजी जाधव हे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी संगणक क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना शिक्षणक्षेत्राला वाहिलेले संकेतस्थळ तयार केले आहे.
रेल्वे फाटकांवर खबरदारीचा इशारा देणारी यंत्रणा लवकरच सुरू :
- विमानाच्या धर्तीवर रेल्वेगाडय़ांच्या चालकांना मानवरहित रेल्वे फाटकांवर खबरदारीचा इशारा देणारी यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल.
- वाराणसी येथील डिझेल इंजिन कारखान्यातील अभियंत्यांनी आपल्या सल्ल्यानुसार हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
विद्युतचुंबकीय शक्तीवर चालणारा यांत्रिक बाहू तयार करण्याच्या प्रकल्पात :
- नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे “नासा” या अमेरिकी संस्थेने स्टार ट्रेक चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अवकाशात काम करू शकणारा विद्युतचुंबकीय शक्तीवर चालणारा यांत्रिक बाहू तयार करण्याच्या प्रकल्पात एका अमेरिकी कंपनीशी सहकार्य करण्याचे ठरवले आहे.
- अवकाशातील कुठलीही वस्तू हा बाहू पकडू शकेल, त्यात उपग्रहही पकडता येतील, उपग्रह किंवा अवकाश कचरा चक्क उचलून दूर करण्याचा मार्गही त्यात उपलब्ध असेल.
- नासाने त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या अॅर्क्स पॅक्स कंपनीशी करार केला असून त्या अंतर्गत ‘बॅक टू फ्युचर’ चित्रपटातील मार्टी मॅकफ्लायच्या तरंगणारा स्केटिंगबोर्ड तयार केला जाईल.
- त्यात विद्युतचुंबकीय शक्तीचा वापर केला जाणार आहे.
- तसेच यात हेंडो ओव्हरबोर्ड वापरला असून त्यावर काही इंजिनांच्या मदतीने विरूद्ध बाजूने चुंबकीय क्षेत्र खालून लावले जाते, त्यामुळे तो बोर्ड उंच उचलला जातो.
दिनविशेष :
- 1926 : जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला.
- 1944 : दुसरे महायुद्ध-लंडनवर पहिल्यांदा व्ही.2 बॉम्बचा हल्ला.
- 1962 : अल्जीरियाने नवीन संविधान अंगिकारले.
- 1991 : मॅसिडोनियाला स्वातंत्र्य.
- 1933 : आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक यांचा जन्म.