Current Affairs of 9 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 एप्रिल 2018)

देशात केवळ 6 विमानतळांवरच बॉम्ब निष्क्रीय करणं शक्य :

  • देशातील 59 मुख्य विमानतळांपैकी केवळ 6 विमानतळांवरच सीआयएसएफची टीम बॉम्ब निष्क्रीय करू शकण्याची सुविधा आहे.त्यात केवळ दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, कोचिन आणि हैदराबाद या सहा ठिकाणीच बॉम्ब निष्क्रीय करण्याची सुविधा असल्याची माहिती समोर आली आहे.
  • जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान केलेल्या पाहणीमध्ये याबाबतची माहिती समोर आली आहे.
  • सहा विमानतळांपैकी फक्त कोलकाता आणि चेन्नई विमानतळ हे एअरपोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाद्वारे(AAI) चालवले जातात, तर इतर विमानतळ खासगी आहेत.
  • ब्यूरो फॉर सिविल एविएशन सिक्युरिटी (BCAS) च्या नियमांनुसार, विमानतळावर जवळपास 28 वस्तूंचा वापर बॉम्ब निष्क्रीय करण्यासाठी केला जातो. पण या सर्व आवश्यक वस्तू केवळ 6 विमानतळावरच उपलब्ध असल्याची माहिती आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 एप्रिल 2018)

आणखी पाच स्थानके लवकरच रोकडरहित :

  • रेल्वे स्थानकातील सेवांचा लाभ घेताना प्रवाशांनी जास्तीत जास्त रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारावर भर द्यावा, या उद्देशाने मध्य रेल्वेवरील आणखी पाच स्थानकांवर रोकडरहित सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे या तीन स्थानकांनंतर आता आणखी पाच स्थानकांत रोकडरहित सुविधा सुरू केली जाणार आहे. यामध्ये दादर, माटुंगासह भायखळा, कल्याण, अंबरनाथ स्थानकांचा समावेश आहे.
  • तिकीट खिडक्यांवर, रेल्वे हद्दीतील वाहन पार्किंग सुविधा, प्रसाधनगृह, खाद्यपदार्थ आणि बुक स्टॉल्स, विश्रामकक्षांसाठी शुल्क देण्यासाठी पीओएस यंत्र, पेटीएम, स्कॅन कोड इत्यादी सुविधा येत्या सहा महिन्यांत टप्प्याटप्प्यात उपलब्ध केल्या जातील.

नळदुर्ग किल्ला दहावीच्या पुस्तकात :

  • महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल या विषयासाठी नळदुर्ग किल्ल्याच्या माहितीवर आधारित पाठ तयार केला आहे.
  • त्यामुळे नळदुर्ग किल्ल्याची माहिती महाराष्ट्रासह देशाच्या नकाशावर पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
  • नवीन शैक्षणिक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नळदुर्ग किल्ल्याला इयत्ता 10 वी च्या भूगोल विषयातील अभ्यासक्रमासाठी निवडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना किल्ल्यांची माहिती आता शालेय स्तरावर वर्गात शिकवली जाणार आहे.
  • भूगोलाच्या विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटीसाठी देखील नळदुर्ग किल्ला अभ्यासक्रमात घेण्यात आला आहे. ही क्षेत्रभेट नळदुर्ग ते अलिबाग माग्रे सिंहगड अशी ठरविण्यात आली आहे.

भारतीय महिलांना ऐतिहासिक सुवर्णपदक :

  • मनिका बात्राच्या एकेरीतील दिमाखदार विजयाच्या बळावर भारताने चार वेळा विजेत्या सिंगापूरचा 3-1 असा पाडाव करीत राष्ट्रकुलमधील महिलांच्या सांघिक टेबल टेनिस स्पर्धेचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.
  • राष्ट्रकुलमधील टेबल टेनिस क्रीडा प्रकारात भारताने पटकावलेले हे दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी भारताने 2006 मध्ये सोनेरी यश मिळवले होते.
  • जागतिक क्रमवारीत 58व्या स्थानावर असलेल्या मनिकाने प्रथम कारकीर्दीतील सर्वोच्च विजय संपादन करताना क्रमवारीत चौथ्या स्थानावर आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या फेंग तियानवेईचा 3-2 असा पराभव केला. मग 100व्या स्थानावरील यिहान झोऊचा 3-0 असा पराभव केला.

वेटलिफ्टर्स प्रदीप सिंहला रौप्यपदक :

  • स्पर्धेच्या पाचव्या दिवसाला सुरुवात होताच प्रदीप सिंहने रौप्यपदकाची कमाई केली आहे.
  • भारताचे हे या स्पर्धेतील तिसरे रौप्यपदक आहे.
  • प्रदीपने सुवर्णपदक विजेत्या समोआ सनेले माओला कडवी झुंज दिली. मात्र त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
  • प्रदीप सिंहने राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवसाला सुरुवात होताच 105 किलो गटात रौप्यपदकाची कमाई केली.
  • प्रदीप सिंहने अंतिम फेरीत समोआ सनेले माओला जबरदस्त झुंज दिली. तिसऱ्या प्रयत्नात त्याने 152 किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले.

‘क्रेडिट-डेबिट’ कार्डद्वारे ‘स्मार्ट’ तिकीट :

  • लोकलच्या 76 लाख प्रवाशांना लवकरच क्रेडिट-डेबिट कार्डने उपनगरीय लोकलचे तिकीट खरेदी करता येणार आहे.
  • आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपनगरीय तिकीट प्रक्रिया सुलभ होण्यासाठी याबाबत रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने (क्रिस) नुकतीच यशस्वी चाचणी केली आहे.
  • लवकरच ही सुविधा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुरू करण्यात येणार आहे.
  • सद्यस्थितीत लोकल तिकिटांसाठी तिकीट खिडकीसह एटीव्हीएम, स्मार्ट कार्ड, सीओटीव्हीएम (सुट्टे पैसे टाकून तिकीट घेणे), मोबाइल तिकीट, जनसाधारण तिकीट सेवा असे पर्याय आहेत.

दिनविशेष :

  • 1867 मध्ये रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.
  • बोइंग-767 या विमानाने 1967 मध्ये पहिले उड्डाण केले.
  • 1995 मध्ये लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.
  • 1828 मध्ये समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 एप्रिल 2018)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago