Current Affairs of 9 August 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2015)

पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर जाणार :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर जाणार आहेत.

  • गेल्या 34 वर्षांमध्ये यूएईचा दौरा करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान असतील.
  • दुबईतील भारतीय समुदायाच्या समितीकडून (आयसीडब्लूसी) पंतप्रधान मोदींचा दुबई क्रिकेट स्टेडियमवर भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
  • पंतप्रधान 16 व 17 ऑगस्टला यूएईच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे, सांगण्यात येत आहे.
  • यापूर्वी यूएईच्या दौऱ्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी 1981 मध्ये गेल्या होत्या.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2015)

मायकेल क्‍लार्कची ऍशेस मालिकेनंतर निवृत्त होणार असल्याची घोषणा :

  • मायकेल क्‍लार्क याने ऍशेस मालिकेनंतर निवृत्त होणार असल्याची शनिवारी घोषणा केली.

  • मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे होणार आहे.
  • मायकेल क्‍लार्कने सर्वोत्तम फलंदाज म्हणून 34 वर्षीय कारकिर्दीमध्ये त्याने 114 सामन्यांत 28 शतके झळकाविली आहेत.

अण्णा हजारे यांच्या जीवनावर “अण्णा” हा हिंदी चित्रपट :

  • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जीवनावर “अण्णा” हा हिंदी चित्रपट येत आहे.
  • त्यात शशांक उदापूरकर अण्णांची व्यक्तिरेखा साकारत आहे.
  • तसेच 1947 पासूनचा त्यांचा जीवनप्रवास यात दाखवण्यात येणार आहे.
  • ‘द राईज पिक्‍चर्स’ बॅनरखाली निर्माते मणिंद्र जैन हा चित्रपट बनवत आहेत.

राज्यपालपदी रामनाथ कोविंद आणि आचार्य देव व्रत यांची नियुक्ती :

  • बिहार आणि हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी अनुक्रमे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रामनाथ कोविंद आणि आचार्य देव व्रत यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
  • उत्तर प्रदेशातील कानपूरचे 69 वर्षीय कोविंद हे दोन वेळेस राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत.
  • तसेच काही महिन्यांतच बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर कोविंद यांची नियुक्ती केंद्र सरकारने केली आहे.
  • पश्‍चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे सध्या बिहारच्या राज्यपाल पदाचा कार्यभार आहे.

ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव एका जागतिक उपग्रहाला दिले जाणार :

  • माजी दिवंगत राष्ट्रपती व थोर वैज्ञानिक ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव एका जागतिक उपग्रहाला दिले जाणार आहे.

  • पृथ्वी निरीक्षण व आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी ग्लोबल स्टॅट फॉर डीआरआर हा उपग्रह संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून सोडला जाणार असून त्याला कलाम यांचे नाव दिले जाईल.
  • सीएएनइयूएसच्या अवकाश तंत्रज्ञान संघटनेचे ( कॅनडा, युरोप, अमेरिका व आशिया यांची संस्था) अध्यक्ष मिलिंद पिंपरीकर यांनी ही माहिती दिली.
  • या संस्थेचे मुख्यालय कॅनडातील मॉंट्रियल येथे आहे.
  • तसेच 1999 मध्ये सीएएनइयूएस ही संस्था स्थापन झाली असून अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सामुदायिक पातळीवर समस्या निर्मूलनाचा या संस्थेचा उद्देश आहे.
  • आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी उपग्रहांचा उपयोग करण्याचे ठरवण्यात आले असून त्यासाठी हा नवीन उपग्रह सोडला जाणार आहे.
  • संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आपत्ती निवारण परिषदेच्या निमित्ताने जपानमध्ये सेंदाई येथे मार्च महिन्यात हा उपग्रह सोडण्याची घोषणा करण्यात आली होती.
  • ग्लोबल सॅट उपग्रह जगातील आपत्ती व्यवस्थापन एकत्रित करता यावे तसेच पर्यावरणाचे नियोजनही करता यावे यासाठी उपयोगी पडणार आहे.
  • त्या उपग्रहात अनेक संवेदक असून हवामान अंदाज व पूर, दुष्काळ, चक्रीवादळे, भूकंप व वणव्याच्या काळात माहिती पुरवण्याची व्यवस्था आहे.

दिनविशेष :

  • 9 ऑगस्ट क्रांतिदिन
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2015)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago