चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2016)
9 ऑगस्ट ऐतिहासिक क्रांती दिवस :
- भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 9 ऑगस्ट 1942 या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तत्कालीन कॉंग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला चले जाव चा इशारा दिला.
- तसेच या दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणार्या भारतीयांनी करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची भूमिका घेऊन, इंग्रजांना छोडो हिंदुस्थान हा अखेरचा इशारा दिला होता.
- तोपर्यंत शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्या कॉंग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती.
- 9 ऑगस्ट हा दिवस पुढे क्रांतीदिन म्हणून ओळखला जाऊ लागला. इतकी स्पष्ट आणि कडक भूमिका घेऊनही, इंग्रजांनी आणखी पाच वर्षे आपल्याला स्वातंत्र्य दिलेच नाही, हेही महत्त्वाचे आहे.
- 9 ऑगस्ट 1942 ते 15 ऑगस्ट 1947 हा कालावधी प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवायलाच हवा, इतका ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे.
- 1942 च्या जुलैमध्ये छोडो हिंदुस्थानचा इशारा, नव्हे, आदेशच इंग्रजांना देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला होता. कॉंग्रेसच्या त्या प्रस्तावात, हिंदुस्थानातली ब्रिटिश राजवट ताबडतोब संपुष्टात आली पाहिजे.
- हिंदुस्थान स्वतंत्र होणे हे केवळ त्याच्याच हिताचे नसून सार्या जगाचेही हित त्यात सामावलेले आहे. हुकूमशाही, साम्राज्यशाही, लष्करशाही आदी अनिष्ट प्रवृत्तींशी यशस्वी मुकाबला करण्यासाठी हिंदुस्थान स्वतंत्र होणे आवश्यक आहे.
- त्यावेळचे कॉंग्रेसचे अध्यक्ष मौलाना आझाद यांनी 7 ऑगस्ट 1942 ला या प्रस्तावाच्या कॉंग्रेस महासमितीच्या मंजुरीसाठी मुंबईला अधिवेशन बोलावले होते.
- कार्यसमितीच्या प्रस्तावाला महासमितीनेही प्रचंड बहुमताने पाठिंबा दर्शविला होता.
माइकल फेल्प्सने जिंकले 19 वे सुवर्णपदक :
- अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्स याने आपण सर्वकालीन सर्वोत्तम जलतरणपटू आहोत हे सिद्ध करून दाखविताना, ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ऐतिहासिक 19 वे सुवर्णपदक पटकाविले.
- करिअरमधील शेवटची ऑलिंपिक स्पर्धा खेळत असलेल्या फेल्प्सचे ऑलिंपिक स्पर्धांमधील हे एकूण 23 वे पदक आहे.
- फेल्प्स, कॅलेब ड्रेसेल, रायन हेल्ड आणि नॅथन आद्रियनचा समावेश असलेल्या अमेरिकन संघाने 4 बाय 100 मीटर फ्रीस्टाइल रिले प्रकारात 3 मिनिटे 9.92 सेकंद इतकी वेळ नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
- फ्रान्सच्या संघाने 3 मिनिटे 10.53 सेकंदासह रौप्यपदक, तर ऑस्ट्रेलियाने 3 मिनिटे 11.37 सेकंद वेळ नोंदवत ब्रॉंझपदक पटकाविले.
- फेल्प्सने पहिल्याच अथेन्स ऑलिंपिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 ब्रॉंझपदकांची कमाई करून विक्रम रचला होता.
- तसेच त्यानंतर बीजिंग ऑलिंपिकमध्ये त्याने 8 सुवर्णपदके, तर लंडन ऑलिंपिकमध्ये 4 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके अशी कमाई केली होती.
- महिलांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये ऍडम पिटीने विश्वविक्रमासह ब्रिटनला सुवर्णपदक मिळवून दिले.
भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानक बियास :
- नॉर्दन रेल्वेच्या फिरोजपूर क्षेत्रात जालंधर-अमृतसर मार्गावरील बियास रेल्वेस्थानकाला भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- स्वच्छतेच्या निकषावर देशातील रेल्वस्थानकांची क्रमवारी तयार करण्यासाठी आयआरसीटीसीने देशातील मुख्य रेल्वेस्थानकांची पाहाणी केली होती.
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
- कमी वर्दळीचे अतिशय शांत अशा छोटयाशा बियास रेल्वेस्थानकाला सर्वात स्वच्छ रेल्वेस्थानकाच्या वर्गवारीत ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे.
- गांधीधाम, वास्को-दी-गामा, जामनगर आणि कुंभकोणम या रेल्वेस्थानकांना या यादीत अनुक्रमे दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान प्राप्त झाले आहे.
विष्णुदास भावे यांचा स्मृतिदिन :
- मराठी रंगभूमीचे जनक. संपूर्ण नाव विष्णु अमृत भावे. सांगली संस्थानाचे अधिपती श्रीमंत चितांमणराव ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन ह्यांच्या खाजगीकडे ते नोकर होते. कथा-कविता लिहिण्याचा नाद विष्णूदासांना होता.
- 1842 मध्ये कर्नाटकातून ‘भागवत‘ नावाची एक नाटकमंडळी सांगलीत आली होती. तिचे खेळ पाहिल्यानंतर तशा प्रकारचे नाट्यप्रयोग काही सुधारणा करून मराठीत केले, तर त्यांचे चांगले स्वागत होईल, अशी कल्पना आप्पासाहेबांच्या मनात आली व हे काम त्यांनी विष्णुदासांवर सोपविले.
- तसेच त्यानुसार विष्णुदासांनी 1843 मध्येसीतास्वयंवर ह्या स्वतःच रचिलेल्या नाटकाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला.
- सूत्रधाराकडून मंगलाचरण, नंतर वनचरवेषधारी विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण, विघ्नहर्त्या गजाननाचे स्तवन, सरस्वतीस्तवन, गजानन व सरस्वती ह्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ, अशी विष्णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती.
जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू पॉल पोग्बा :
- फ्रान्सचा फुटबॉलपटू पॉल पोग्बाने इंग्लंडच्या मॅन्चेस्टर युनायटेडशी जवळपास 815 कोटी रुपयांचा करार केला आहे.
- 5 वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. या करारासोबत पॉल पोग्बा सर्वात महागडा फुटबॉलपटू ठरला आहे.
- तसेच गेल्या चार वर्षात पॉल पोग्बाने केलेल्या कामगिरीच्या आधारे त्याच्याशी ही करार करण्यात आला आहे.
- पोग्बानं कमाईच्या बाबतीत आता गॅरेथ बेल आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनाही मागे टाकलं आहे.
- गॅरेथ बेलनं 2013 साली रिआल माद्रिदशी 740 कोटी रुपयांचा करार केला होता.
- मॅन्चेस्टर युनायटेडमधून आपल्या करिअरची सुरुवात कऱणा-या पॉल पोग्बाने 2012 साली पोग्बा इटलीच्या युवेंटस संघात प्रवेश केला होता.
कोसोवोला ऑलिंपिकमध्ये पहिले सुवर्ण पदक :
- ‘सुवर्ण कन्या’ अशीच तिची तिच्या देशामध्ये ओळख होती.. आता ही ओळख अधिकच पक्की झाली आहे; कारण तिने चक्क ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक पटकाविले आहे. हे पदक तिच्यासाठी आणि तिच्या देशासाठी खूपच महत्त्वाचे आहे.
- कारण, तिचा देश आहे कोसोवो आणि हे पदक म्हणजे कोसोवोचे ऑलिंपिकमधील पहिले पदक आहे, माजिंदा केलमेंडी हे त्या ‘सुवर्ण कन्ये’चे नाव.
- रिओ ऑलिंपिकमध्ये (दि.7) झालेल्या ज्युदोतील महिलांच्या 52 किलो वजनी गटात माजिंदाने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
- अंतिम सामन्यात माजिंदाने इटलीच्या ऑडेटी ग्युफ्रिदा हिचा पराभव केला.
- दोन वर्षांपूर्वी कोसोवोला ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती’चे (आयओसी) सदस्यत्व मिळाले.
- 2008 मध्ये या देशाला सर्बियापासून स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे यंदा प्रथमच या देशाचे खेळाडू स्वत:च्या ध्वजासह ऑलिंपिकमध्ये सहभागी झाले आहेत.
- तसेच यापूर्वी लंडन ऑलिंपिकमध्ये माजिंदाने अल्बेनियाकडून खेळताना ब्रॉंझ पदक पटकाविले होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा