चालू घडामोडी (9 डिसेंबर 2016)
वीज वितरणाच्या विकासासाठी राज्यसरकार कडून योजना :
- वीज वितरण व्यवस्थेच्या पायाभूत विकसासाठी चार हजार कोटी रुपयांची योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.
- तसेच ही योजना लवकरच कॅबिनेटसमेर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रश्नोत्तराच्या दरम्यान बुलडाणा येथील आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
- सपकाळ यांनी बुलडाणा येथील रुईखेड टेकाळे येथे फेब्रुवारी महिन्यापासून रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद असल्याने पीक नष्ट झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
- ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, चक्रीवादळामुळे काम वेळेत पूर्ण करण्यात अडचणी आल्या. परंतु आता ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यात आला आहे.
- 100 गावांच्या पायाभूत विकासासाठी डीपीआर तयार केला जात आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात आर. आश्विनचे नवे विक्रम :
- इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने यापूर्वीच 2-0 ने आघाडी घेतली आहे.
- भारतीय क्रिकेटची पंढरी असणाऱ्या वानखेडेवर रंगलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने भक्कम सुरुवात केली परंतु, रविचंद्रन आश्विनने अखेरच्या सत्रात केलेल्या अचूक माऱ्यापुढे त्यांचा डाव काहीसा गडगडल्याने अखेर पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने 5 बाद 288 धावा अशी मजल मारली.
- मोईन अलीला बाद करून आश्विनने दिग्गज वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथला (236) मागे टाकताना सर्वाधिक कसोटी बळी घेणारा सातवा भारतीय गोलंदाज म्हणून मान मिळवला. आश्विनच्या खात्यात आता 239 बळींची नोंद आहे.
- वानखेडे स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या फलंदाजाची याआधीची सर्वाधिक खेळी 88 धावांची होती. इंग्लंडच्याच ओवेस शाहची ही कामगिरी जेनिंग्सने मागे टाकली.
भारताची धडाकेबाज विजयी सलामी :
- यजमान भारताने 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा ज्युनिअर विश्वचषक पटकावण्याच्या आपल्या मोहिमेला यशस्वी सुरुवात करताना कॅनडाचा 4-0 असा पराभव केला.
- तसेच त्यावेळी, अन्य सामन्यांत गतविजेत्या जर्मनीने स्पेनचे कडवे आव्हान 2-1 असे परतवून विजयी कूच केली, तर न्यूझीलंडने जपानला 1-0 असे नमवले.
- इंग्लंडनेदेखील विजयी सुरुवात करताना दक्षिण आफ्रिकेला 4-2 असे पराभूत केले.
- ‘ड’ गटात झालेल्या एकतर्फी सामन्यात भारतीय संघाने तुफान आक्रमण करताना कॅनडाला सहज पराजित केले.
इस्त्रोकडून सॅट 2 ए उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण :
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्त्रो) 7 डिसेंबर रोजी सकाळी सॅट 2 ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
- सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसलव्ही सी-36 या प्रक्षेपकाद्वारे सॅट 2 ए उपग्रह आकाशात सोडण्यात आला.
- तसेच या उपग्रहाचे वजन 1,235 किलो असून तो पृथ्वीच्या कक्षेत 817 किलोमीटर अंतरावर फिरत राहणार आहे. अंतराळ मोहिमांमधील भारताची ही मोठी कामगिरी आहे.
- सॅट-2 ए या उपग्रहाद्वारे जागतिक वापरकर्त्यांना रिमोट सेन्सिंग डेटा सुविधा पुरविली जाईल. रिसोर्ससॅट श्रेणीतील हा तिसरा उपग्रह आहे. यापूर्वी 2003 मध्ये रिसोर्ससॅट-1 आणि 2011 मध्ये रिसोर्ससॅट-2 हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले होते.
- रिसोर्ससॅट हा जगातल्या उत्तम रिमोट सेन्सिंग उपग्रहांपैकी एक आहे.
- जगातील अनेक देशांना या उपग्रहामार्फेत सेवा पुरविण्यात येते. इस्त्रोच्या पीएसएललव्ही-36 या प्रक्षेपकाद्वारे हा सॅट-2 ए अवकाशात सोडण्यात आला.
- 1994 पासून 2016 पर्यंत 18 वर्षांत पीएसएलव्हीच्या माध्यमातून 36 यशस्वी प्रक्षेपणांतून 121 उपग्रह अंतराळात सोडण्यात भारत यशस्वी झाला आहे.
दिनविशेष :
- 9 डिसेंबर 1919 केरळचा माजी मुख्यमंत्री ई.के. नयनार यांचा जन्मदिन आहे.
- 9 डिसेंबर 1946 इटलीत जन्मलेली भारतीय राजकारणी सोनिया गांधी यांचा जन्मदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा