चालू घडामोडी (9 फेब्रुवारी 2018)
जगातील 20 एअरलाईन्स कंपन्या आहेत स्टार अलायन्सच्या सदस्य
- एअर इंडिया आणि स्टार अलायन्सच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीतील एअर इंडियाच्या मुख्यालयात स्टार अलायन्सचा 20 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे.
- जगातील 20 एअरलाईन्स कंपन्या स्टार अलायन्सच्या सदस्य आहेत तर भारतीय उपखंडात फक्त एअर इंडिया हीच एकमेव कंपनी तिची सदस्य आहे.
- 1974 मध्ये स्टार अलायन्सची स्थापना करण्यात आली होती.
- आतापर्यंत या अलायन्सला अनेक जागतिक कीर्तीचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात बिझनेस ट्रॅव्हलर मॅगझिन आणि स्कायट्रॅक्सतर्फे दिला जाणारा एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड मार्केट लीडरशिप अवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट एअरलाईन अवॉर्ड समावेश आहे.
आता मिळणार ‘सरोगसी’ने आई झालेल्या महिलेला मातृत्व रजा :
- सरोगसीद्वारे मूल झालेल्या केंद्र सरकारच्या महिला कर्मचार्यांना मातृत्व रजेचा अधिकार आहे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. तर या महिलांना 26 आठवड्यांची सुटी मिळू शकणार आहे.
- तर केंद्रीय विद्यालयातील एका शिक्षिकेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालेदा झिया यांना 5 वर्षांचा तुरुंगवास :
- बेगम खालेदा झिया या दोन वेळेस बांगलादेशच्या पंतप्रधान राहिल्या आहेत तर ‘झिया अनाथआश्रमा’साठी मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या रकमेत अपहार केल्याप्रकरणी दोषी ठरल्या आहेत. यासाठी ढाक्यातील कोर्टाने त्यांना ही शिक्षा सुनावली.
- या प्रकरणात झिया यांचा मुलगा तारिक रहमान आणि इतर चार जणांना 10 वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
आता ड्रायव्हिंग लायसन्सही जोडणार ‘आधार’शी :
- बनावट परवान्याची समस्या दूर करण्यासाठी परवान्याला आधार क्रमांकाशी जोडण्याचे काम सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. तर सर्व राज्यांचा यात समावेश करत एक नवीन सॉफ्टवेअर तयार केले जात आहे.
- तसेच बनावट परवान्याविषयी माहिती मिळविण्यासाठी एनआयसीकडून सारथी- 4 सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू असून नंतर ते आधार क्रमांकाशी जोडले जाणार आहे.
- त्यामुळे सॉफ्टवेअर सुरू झाल्यानंतर देशात कुठूनही बनावट परवाना काढता येणार नाही.
अमेरिकेतील नॅन्सी पेलोसी यांनी मोडला भाषणाचा 108 वर्षांचा विक्रम
- अमेरिकेत ज्येष्ठ डेमोक्रॅटिक खासदार नॅन्सी पेलोसी यांनी सभागृहात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम केला आहे. तर पेलोसी यांनी कागदपत्रे नसलेल्या युवा प्रवासी नागरिकांच्या मुद्द्यावर 8 तास 7 मिनिटे भाषण केले आहे.
- त्याचबरोबर त्यांनी सभागृहात भाषण देण्याचा 109 वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे.
- अमेरिकेच्या संसदेत याआधी 1909 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते चॅम्प क्लार्क यांनी 5 तास, 15 मिनिटे भाषण केले होते.
दिनविशेष :
- 1933 : साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
- 1951 : स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू झाली.
- 1969 : बोइंग-747 विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.
- 1874 : स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा