Current Affairs (चालू घडामोडी) of 9 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | मुंबई मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची मजुरी |
2. | विद्यापीठ परीक्षा मंडळ निर्मिती योजना |
3. | ‘आयआयएम’ला केंद्राचे ‘गो अहेड’ |
4. | विराट कोहलीचा नवीन विक्रम |
5. | गांधीजी आगमनाला शंभर वर्ष पूर्ण |
6. | दिनविशेष |
मुंबई मेट्रोच्या दरवाढीला हायकोर्टाची मजुरी :
- मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरोधात राज्य सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टाने मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
- मुंबई मेट्रोचे सध्याचे दर 10,15 आणि 20 रुपये असे आहे.
- तर मेट्रोचे प्रास्ताविक दर 10,20,30 आणि 40 रुपये इतके आहेत.
विद्यापीठ परीक्षा मंडळ निर्मिती योजना :
- दहावी-बारावी प्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा एकत्रित घेण्याचे ‘विद्यापीठ परीक्षा मंडळ ‘ निर्मितीची योजना’ तयार केली जाणार आहे.
- या परीक्षा मंडळाचा कारभार आयएएस अधिकार्यांच्या देखरेखीखाली चालेल.
- याबबाद फेब्रुवारीमध्ये राजधानीत होणार्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम रूप येईल.
- ‘आयआयएम’ला केंद्राचे ‘गो अहेड’ :
- देशातील सर्वोच्च पातळीवरील व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’(इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट) नागपुरात स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने परवानगी दिली आहे.
- ‘आयआयएम अहमदाबाद‘कडे ‘आयआयएम-नागपुरचे पालकत्व देण्यात येणार आहे.
- 2015-16 या सत्रापासून येथे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न राहणार आहेत.
- ‘आयआयएम’ साठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यांचा विचार करण्यात आला होता.
- ‘आयआयएम’ साठी 200 एकर जागेचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
विराट कोहलीचा नवीन विक्रम :
- ऑस्ट्रेलियावरील कर्णधार विराट कोहलीने नवा विक्रम प्रस्तापित केला आहे.
- ऑस्ट्रेलियात एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावसंख्या करण्याच्या विक्रमाची नोंद राहुल द्रविडच्या नावावर होती.
- हा विक्रम मोडत कर्णधार कोहलीने चार कसोटी सामन्याच्या मालिकेत सर्वाधिक म्हणजे 639 धावा काढल्या आहेत.
- ही कसोटी सिडनी येथे खेळली जात आहे.
गांधींच्या आगमनाला शंभर वर्ष पूर्ण :
- महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले, त्याला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.
- ते आपल्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्यासोबत मुंबई बंदरावर उतरले.
- इंग्लंड त्यांनी बॅरिस्टर झालेले व आफ्रिकेत आफ्रिकेत वकिलीत लोकिक मिळविलेले पारंपरिक काठेवाडी पोषाखात भारतात परतले.
- भारतीयांना अपमान व अन्याय यापासून सुटकारा देण्यासाठी ते भारतात परतले.
दिनविशेष :
- 9 जानेवारी – राष्ट्रीय पर्यटन दिन
- 1880 – आदय क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्म ठेपेची शिक्षा. त्यांना ‘तेहरान‘ या जहाजावरून एडनला पाठविण्यात आले.
- 1940 – जर्मन विमानांनी उत्तर सागरात तीन व्यापक जहाजे बुडवली.
- 2002 – भारतीय महिलांनी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकली.