Current Affairs of 9 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 जानेवारी 2017)

रणदीप हुडा भारताचा ‘फायर’ ब्रँड अँबॅसेडर :

  • भारतातील अग्निशमन सेवेचा बँड अँबॅसेडर म्हणून अभिनेता रणदीप हुडा याची निवड करण्यात आली आहे.
  • केंद्र सरकारची संस्था ‘द स्टँडिंग फायर अॅडवायजरी काउन्सिल’ने (SFC) रणदीपची निवड केली आहे.
  • “प्रत्येक सेवेचा एक ब्रँड अँबॅसेडर असतो. त्याचप्रमाणे आम्हीही आमचा एक बँड अँबॅसेडर बनविण्याचा निर्णय घेतला. देशातील अग्निशमन सेवेचा चेहरा बनण्यासाठी SFC आणि केंद्र सरकारने त्याच्याशी संपर्क केला,” असे मुंबई अग्निशामक दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी पी.एस. रहंगदले यांनी सांगितले.
  • रणदीपने हा प्रस्ताव स्वीकारला असून, तो भविष्यात अग्निसुरक्षा अभियानांमध्ये सहभागी होईल.
  • तसेच अभिनेता रणदीप हुडा या आधी मुंबई अग्निशामक दलाचा ब्रँड अँबॅसेडर राहिलेला आहे.

MPSC परीक्षेच्या वेळापत्रकात बदल :

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या विक्रीकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक आणि वन सेवा या पदांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
  • प्रशासकीय कारणास्तव हा बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांची त्याची नोंद घ्यावी, असे एमपीएससीतर्फे कळविण्यात आले आहे.
  • एमपीएससीच्या वतीने 21 नोव्हेंबर 2016 रोजी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात विक्रीकर निरीक्षक 2016 या पदाची पूर्व परीक्षा 29 जानेवारी रोजी, तर मुख्य परीक्षा 28 मे रोजी घेतली जाणार असल्याचे नमूद केले होते.
  • परंतु, विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही परीक्षा 28 मेऐवजी 3 जून रोजी घेतली जाईल.
  • तसेच राज्य उत्पादन शुल्क गट क दुय्यम निरीक्षक पदाची पूर्व परीक्षा 2 जुलै रोजी व मुख्य परीक्षा 15 ऑक्टोबर रोजी घेतली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, आता या पदाची पूर्व परीक्षा 28 मे रोजी तर मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर रोजी घेतली जाईल.
  • महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2017 या पदाची पूर्व परीक्षा 4 जून रोजी, तर मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. परंतु, बदललेल्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा 15 ऑक्टोबर रोजी होईल.
  • विक्रीकर निरीक्षकवन सेवा पदाच्या पूर्व परीक्षेच्या तारखांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, शासनाकडून निश्चित कालावधीत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतरच वेळापत्रकानुसार पदे जाहीर करून परीक्षा घेतली जाईल, असेही एमपीएससीने स्पष्ट केले आहे.

आगुतने जिंकले चेन्नई ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद :

  • एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात आक्रमक खेळ करताना स्पेनच्या रॉबर्टो बितिस्ता आगुतने रशियाच्या युवा खेळाडू डेनिल मेदवेदेव याला 6-3, 6-4 असे नमवून चेन्नई ओपन पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले.
  • आगुतचे हे करिअरमधील पाचवे एकेरी विजेतेपद ठरले. तर, मेदवेदेव आपल्या पहिल्या एटीपी वर्ल्ड टूर विजेतेपदापासून वंचित राहिला.
  • आगुतने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेताना सामन्यावर आपले वर्चस्व राखले. त्याच्या वेगवान खेळापुढे मेदवेदेवला फारशी संधी मिळाली नाही. त्याचवेळी दबावाखाली झालेल्या चुकांचा फटकाही मेदवेदेवला बसला.
  • मेदवेदेवला अनेकदा आपल्या चुकीच्या सर्विसच्या फटका बसला. तर, आगुतने आपल्या वेगवान व ताकदवर सर्विसच्या जोरावर मेदवेदेवला चांगलेच जेरीस आणले.
  • एक तास 11 मिनिटांपर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यात आगुतने आपल्या सर्विसवर केवल 8 गुण गमावले. त्याचवेळी मेदवेदेवने अनेकदा आगुतला दिर्घ रॅली खेळण्यास भाग पाडले. परंतु, जम बसलेल्या आगुतने अनेक वेळा या रॅली आपल्या नावावर करीत गुणांची कमाई केली.

सानिया मिर्झाने जिंकले दुहेरीचे विजेतेपद :

  • भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाने अमेरिकेच्या बेथानी माटेक सँड्स हिच्या साथीने ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत महिला दुहेरीच्या रूपाने या सत्रातील आपले पहिले विजेतेपद पटकावले; परंतु नंबर वनची दुहेरीची रँकिंग मात्र तिने गमावली आहे.
  • भारत आणि अमेरिकेच्या अव्वल मानांकित जोडीने अंतिम सामन्यात रशियाच्या एकाटेरिना मकारोव्हा आणि एलेना वेस्नीना या रशियन जोडीवर 6-2, 6-3 असा सरळ सेट्सने विजय मिळवला.
  • तसेच या यशानंतरही सानिया तब्बल 91 आठवड्यांतील डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू म्हणून राहण्याची मालिका मात्र खंडित झाली. आता नंबर वन स्थानावर बेथानीने कब्जा मिळविला आहे.
  • सानिया या सामन्यात गत चॅम्पियनच्या रूपाने उतरली होती. तिने गेल्यावर्षी देखील या स्पर्धेत स्वीत्झर्लंडची महान खेळाडू मार्टिना हिंगीसच्या साथीने विजेतेपद पटकावले होते.

दिनविशेष : 

  • 9 जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिन आहे.
  • प्रोफेसर वेल्स यांनी मुंबईत 9 जानेवारी 1867 रोजी बलुनचे यशस्वी उड्डाण केले.
  • 9 जानेवारी 1880 रोजी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाली.
  • भारत पाकिस्तान यांच्यात रशियातील ताश्कंद येथे 9 जानेवारी 1966 रोजी करार झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago