Current Affairs of 9 June 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 जून 2018)

चालू घडामोडी (9 जून 2018)

राज्यात दहावीच्या परीक्षेचा निकाल 89.41 टक्के :

  • राज्य माध्यमिकउच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल 89.41 टक्के लागला आहे.
  • बेस्ट ऑफ फाइव्हपद्धतीने राज्यातील 125 विद्यार्थांनी 100 टक्के गुण पटकावले आहेत. यातील तब्बल 70 विद्यार्थी हे एकट्या लातूर विभागातील असून, यामुळे लातूर पॅटर्नचे यश पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
  • राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी 8 जून रोजी पत्रकार परिषदेमध्ये ऑनलाइन निकाल जाहीर केला. राज्यातून 16 लाख 28 हजार 613 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 56 हजार 203 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  • तसेच मागील वर्षी दहावीचा निकाल 88.74 टक्के लागला होता. त्या तुलनेत यंदाच्या निकालात 0.67 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारण्याची परंपरा कायम राखली असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 91.97 तर मुलांचे प्रमाण 87.27 इतके आहे.
  • राज्यातील 9 विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 96 टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूरचा 85-.97 टक्के लागला आहे. मुंबई 90.41, कोकण 96, पुणे 92.08, नाशिक 87-82, नागपूर 85-97, कोल्हापूर 93.88, अमरावती 86.49, औरंगाबाद 88.81 आणि लातूर 86.30 अशी निकालाची टक्केवारी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 86.87 टक्के लागला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 जून 2018)

‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर :

  • प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या नवव्या संसदरत्न पुरस्कारासाठी सात खासदारांची निवड करण्यात आली असून, यामधील पाच खासदार महाराष्ट्राचे आहेत. या सर्व खासदारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चेन्नईत हा पुरस्कार सोहळा पार पडेल.
  • महाराष्ट्रातील ज्या पाच खासदारांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, काँग्रेसचे राजीव सातव, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, आणि भाजपाच्या हिना गावित यांचा समावेश आहे. खासदारांची हजेरी, चर्चेमधील सहभाग, प्रश्नसंख्या, खासगी विधेयकं यांच्या आधारे ही निवड केली जाते.
  • सुप्रिया सुळे यांनी एकूण 74 चर्चांमध्ये सहभाग घेतला असून 16 खासगी विधेयकं सादर केली आहेत. तसंच त्यांनी 983 प्रश्न उपस्थित केले होते. त्यांची उपस्थिती एकूण 98 टक्के आहे. याशिवाय श्रीरंग बारणे यांनी 102 चर्चांमध्ये सहभाग घेतला, तर 16 खासगी विधेयकं सादर केली. त्यांनी 932 प्रश्न उपस्थित केले. त्यांची एकूण हजेरी 94 टक्के आहे.

भारतीय शास्त्रज्ञांनी शोधला नवा ग्रह :

  • अंतराळ विज्ञानामध्ये भारतीय संशोधकांनी नेहमीच महत्त्वाचे शोध लावलेले आहेत. अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) या संस्थेतील संशोधकांनी आता एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 600 प्रकाशवर्षे दूर आहे.
  • संशोधकांनी शोधलेल्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या 27 पट असून, ग्रहाची त्रिज्या आहे पृथ्वीच्या सहापट. हा ग्रह सूर्याच्या भोवती एखाद्या ताऱ्याप्रमाणे फिरत आहे, असे संशोधकांचे मत पीआरएलच्या संकेतस्थळावरील माहितीत नमूद करण्यात आले आहे.
  • माऊंट अबूच्या गुरुशिखर येथील 1.2 मी दुर्बिण व भारतीय बनावटीच्या पीआरएल अ‍ॅडव्हान्स रॅडिकल वेलॉसिटी ऑल स्काय सर्च (पारस) या दोन्हींच्या मदतीने हा शोध लावला आहे.
  • तसेच या शोधामुळे काही मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताने स्थान मिळवले आहे. या ग्रहाचे नाव एपिक 211945201 किंवा के 2-236 असे ठेवले आहे. या ग्रहाचे तापमान खूपच अधिक म्हणजे 600 अंश सेल्सियस आहे. त्याच्यावर जीवसृष्टी असणे शक्यच नाही.

एशियन्स गेम्ससाठी भारतीय फुटबॉल संघ पात्र :

  • एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघ पात्र ठरला आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने फुटबॉल संघाला हिरवा कंदिल दाखवला आहे. यासोबतच हॅण्डबॉल संघही पात्र ठरला आहे.
  • फुटबॉल आणि हॅण्डबॉल दोन्ही संघ अत्यंत चांगली प्रगती करत असून त्यांना संधी मिळाली पाहिजे असं इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितलं आहे.
  • ‘फुटबॉल संघ प्रगती करत आहे. फुटबॉल संघ सध्या 16 व्या क्रमांकावर असून चांगली कामगिरी करत तो 10 व्या क्रमांकावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुरुष संघाला पात्र ठरवण्यात आले आहे’, असंही ते म्हणाले आहेत.
  • हॅण्डबॉल संघाबाबात बोलताना, ते सध्या 12 व्या क्रमांकावर असून अजून चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितले.
  • जिम्नॅस्टिक संघाची निवड करण्यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने पाच सदस्यीय निवड समिती गठीत केली आहे. याशिवाय घोडेस्वारी संघाला न पाठण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडीवरुन झालेल्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला.
  • तसेच जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाने निवड समितीची पाच नावांची शिफारस केली असून इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने ती मान्य केली आहेत.

जुजेपी कोंटे इटलीचे नवे पंतप्रधान :

  • जुजेपी कोंटे यांनी 8 जून रोजी इटलीचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. आघाडी सरकारचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोंटे हे पतंप्रधानपदी विराजमान झाले असून आजच्या शपथविधीनंतर गेल्या काही महिन्यांपासून इटलीत सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेलाही पूर्णविराम मिळाला आहे.
  • नवे सरकार स्थापन झाल्यामुळे इटलीत फेरनिवडणुका टळल्या आहेत. कोंटे हे शिक्षणतज्ञ असून त्यांचा राजकारणातील अनुभव अगदीच तोकडा आहे. त्यामुळे ते सरकारचा गाडा कसा हाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दिनविशेष :

  • अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना 9 जून 1866 मध्ये झाली.
  • एडविन आर्मस्ट्राँग यांनी 9 जून 1935 मध्ये पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
  • भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी 9 जुने 1964 मध्ये सूत्रे हाती घेतली होती.

 

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 जून 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.