चालू घडामोडी (9 मार्च 2017)
मुंबईच्या महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर यांची नियुक्ती :
- मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे विराजमान झाले असून, हेमांगी वरळीकर यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली.
- विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे 76व्या महापौर ठरले आहेत. हेमांगी वरळीकर शिवसेनेच्या पहिल्या उपमहापौर ठरल्या आहेत.
- महाडेश्वर यांच्या बाजूने शिवसेना 84, भाजपा 83 आणि अपक्ष 4 अशा एकूण 171 नगरसेवकांनी मतदान केले आहे.
डेक्कन क्वीनमध्ये प्रथमच महिला टीसीची नियुक्ती :
- भारतीय रेल्वेची शान ओळखल्या जाणाऱ्या “डेक्कन क्वीन”ने आणखी एक इतिहास घडवला. महिला दिनाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने या गाडीवर पहिल्यांदाच आठ महिला चेकर (टीसी) आणि महिला पोलिस यांची नियुक्ती केली.
- डेक्कन क्वीन या गाडीने अनेक उच्चांक नोंदविले गेले आहेत. या गाडीवरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती साठ दिवस आधी निश्चित केली जाते.
- परंतु महिला दिनाचे औचित्य साधून या गाडीवर महिलांना संधी देण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्यांची दखल घेऊन रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक (विभागीय) कृष्णांथ पाटील आणि मध्ये रेल्वेचे जनरल मॅनेजर डी. के. शर्मा यांनी डॉ. सीमा अरोरा यांच्या नेतृत्वाखाली आठ तिकीट चेकर, एक महिला पोलिस यांची नियुक्ती या गाडीवर केली.
- तसेच डेक्कन क्वीन आणि रेल्वेच्या इतिहासात अशा प्रकारे सर्व महिलांची नियुक्ती प्रथमच करण्यात आली.
साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी रुबल अग्रवाल :
- शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी जळगावच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. या संस्थानवर एक आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश न्यायालयाने अलिकडेच दिला होता.
- रूबल अग्रवाल यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपद भूषविले आहेत.
- तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची बदली जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
आर. आश्विन आणि रवींद्र जडेजा संयुक्त अग्रस्थानी :
- रविचंद्रन आश्विन व रवींद्र जडेजा ही भारतीय जोडी आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये संयुक्तरीत्या अग्रस्थानी पोहोचलेली फिरकीपटूंची पहिली जोडी बनली आहे.
- भारताने 7 मार्च रोजी दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाला 75 धावांनी पराभूत केले. या विजयात जडेजा-अश्विनच्या जोडीने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
- रवींद्र जडेजाने सात बळी घेताना, पहिल्या डावात सहा बळी घेतले होते. त्याला कारकिर्दीत प्रथमच अग्रस्थान मिळाले आहे.
- एप्रिल 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन व श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन यांनी संयुक्त अग्रस्थान पटकावले होते.
- आश्विननेही बंगलोर कसोटीत महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याने सामन्यात आठ बळी मिळवत माजी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांची 266 बळींची कामगिरी मागे टाकली. त्याने 269 बळी मिळवत भारताच्या सर्वांत यशस्वी पाच गोलंदाजांमध्ये स्थान मिळविले.
दिनविशेष :
- 9 मार्च 1952 रोजी पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन झाले.
- सन 1982 मध्ये सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग घडला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा