चालू घडामोडी (9 मार्च 2018)
नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा नेफियू रियो यांची नियुक्ती :
- नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे अध्यक्ष नेफियू रियो यांची नागालँडच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा निवड करण्यात आली. त्यामुळे नेफियू रियो हे चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.
- राज्यपाल पी.बी. आचार्य यांनी रियो यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. विशेष म्हणजे त्यांचा शपथविधी सोहळा राजभवनाबाहेर झाला. त्यामुळे राजभवनाबाहेर शपथ घेणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
- नेफियू रियो यांचा शपथविधी सोहळा कोहिमा लोकल मैदानात संपन्न झाला. या शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिज्जू यांच्यासह इतर काही राजकीय नेते उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रशिक्षण संस्था मंजूर :
- पुण्यातील ‘यशदा’च्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रशिक्षण संस्था मंजूर झाली आहे. त्यासाठी 3 कोटी निधी मंजूर झाला असून 75 लाख रुपये निधी प्राप्त झाला असल्याची माहिती बांधकाम समिती सभेत दिली.
- जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. या वेळी सदस्य रवींद्र जठार, जेरॉन फर्नांडिस, श्रीया सावंत, राजेश कविटकर, राजन मुळीक, मनस्वी घारे आदींसह खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
- शासकीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाचे प्रशिक्षण जिल्ह्यातच घेता यावे. प्रशासकीय कामकाजात गती यावी, यादृष्टीने शासनाने ‘यशदा’च्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रशिक्षण संस्थेला मंजुरी दिली आहे.
- तसेच जिल्ह्यात मंजूर असलेल्या शासकीय प्रशिक्षण संस्थेसाठी जिल्ह्याच्या मध्यवर्ती कुडाळ येथे जागा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती बांधकाम समिती सभेत देण्यात आली.
अब्जाधीशांच्या यादीत भारत जगात तिसर्या क्रमांकावर :
- अब्जाधीशांच्या यादीत भारत पहिल्यांदाच जगात तिसऱ्या स्थानावर झळकला आहे. भारतात एकूण 121 अब्जाधीश असून ही संख्या मागील वर्षीपेक्षा 19 अंकांनी वधारली आहे.
- अमेरिकेत सर्वाधिक 585 तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये 373 अब्जाधीश आहेत.
- फोर्ब्जने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज 100 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह प्रथम क्रमांकावर आहेत.
- देशात मुकेश अंबानींची संपत्ती सर्वाधिक 40.1 अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांच्या संपत्तीत मागील वर्षीपेक्षा 16.9 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. त्यांचे भारतातल्या सर्वाधिक श्रीमंताच्या यादीतले स्थान यंदाही अढळ आहे. जागतिक पातळीवर त्यांनी 33व्या क्रमांकावरून 19व्या क्रमांकावर भरारी घेतली आहे.
- तसेच अझीम प्रेमजी यांनी लक्ष्मी मित्तल यांना यंदा मागे टाकत भारतातले सर्वाधिक श्रीमंतांचे दुसरे स्थान पटकावले आहे.
अमेरिकेतील निवडणुकीत पी. कुलकर्णी आघाडीवर :
- मेरिकेतील टेक्सास राज्यामध्ये अमेरिकन काँग्रेसच्या मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाने घेतलेल्या प्रायमरीमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन उमेदवाराने आघाडी घेतली आहे.
- श्री प्रिस्टन कुलकर्णी असे या 39 वर्षीय उमेदवाराचे नाव आहे. डेमोक्रेटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी कुलकर्णी यांना 22 मे रोजी होणाऱ्या पक्षांतर्गत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला मागे टाकावे लागणार आहे.
- टेक्सासमधील बाविसाव्या मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या या प्रायमरीमध्ये कुलकर्णी यांना 9466 मते (32 टक्के) मिळाली. त्यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी लेटिशिया प्लमर यांना 7230 मते (24.3 टक्के) मिळाली. डेमोक्रेटिक पक्षातर्फे पाच इच्छुक शर्यतीत होते.
- टेक्सासच्या निवडणूक कायद्यानुसार जर कोणत्याही उमेदवाराला 50 टक्क्यांपेक्षा अधिक मते न मिळाल्यास आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये पुन्हा पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात येते. जर कुलकर्णी पक्षांतर्गत निवडणुकीत विजयी ठरले, तर त्यांना रिपब्लिकन पक्षाचे काँग्रेससदस्य पीट ऑल्सन यांच्याविरुद्ध निवडणूक लढवता येईल.
दिनविशेष :
- 9 मार्च 1650 मध्ये संत तुकाराम यांचा वैकुंठवास.
- महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म 9 मार्च 1899 मध्ये झाला.
- प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी झाला.
- सन 1959 मध्ये बार्बी या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा