डिजी लॉकर योजना (Digi Locker Yojana)
डिजी लॉकर योजना (Digi Locker Yojana)
*डिजी लॉकर सेवा ही भारत सरकारव्दारे फेब्रुवारी 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
प्रधानमंत्री स्नेह बंधन योजना (Pradhan Mantri Sneh Bandhan Yojana – PMSBY)
डिजी लॉकर सेवा उद्देश –
देशातील नागरिकांना स्वत:ची महत्वपूर्ण कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी व्यक्तिगत इलेक्ट्रॉनिक लॉकर उपलब्ध करून देणे.
*डिजी लॉकरमध्ये नागरिक जास्तीत जास्त 1 जी.बी. माहिती साठवण करू शकतात. अशी माहिती लॉकरचा वापर करण्यासाठी नाकरिकांना त्याच्या आधारकार्ड क्रमांकाशी जोडली जाईल.
*डिजी लॉकरचा वापर नागरिक e-documents सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचबरोबर व्यक्तिगत कागदपत्रे, पॅनकार्ड, मतदान कार्ड, विद्यापीठ प्रमाणपत्रासाठी करतील.
*डिजी लॉकर सुविधा ही केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत पुरवण्यात येईल.
*डिजी लॉकरचा वापर नागरिक e-sign करून करू शकतात.
*डिजी लॉकरमध्ये sign in करण्यासाठी नागरिकांना जवळ स्वत:चा मोबाईल व आधारकार्ड नंबर असायला हवा. त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर आधारकार्डबरोबर रजिस्टर्ड असावा. डिजी लॉकर सुविधेचा वापर करण्यासाठी नागरिकास स्वत:चे अकाऊंट उघडावे लागते. हे अकाऊंट नागरिक आधारकार्डचा नंबर म्हणून Identification नंबर वापर करून उघडू शकतात.
डिजी लॉकर सेवेची वैशिष्ट्ये –
1. डिजी लॉकरचा वापर केवळ असे नागरिक करू शकतात ज्यांच्याजवळ आधारकार्ड आहे.
2. जर नागरिकांचा मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी आधारकार्डशी जोडलेले असेल तर नागरिक डिजी लॉकर सुविधेचा वापर करू शकतात.
3. डिजी लॉकर अंतर्गत प्रथम 10 MB जागा उपलब्ध करण्यात आली होती; परंतु नंतर ती वाढवून 1 GB जागा उपलब्ध करण्यात आली आहे.
डिजी लॉकर सुविधेचे फायदे –
डिजी ई – लॉकरमुळे कधीही कुठेही आपली महत्वाची कागदपत्रे हवी असतील तर त्यावेळी फक्त आधारकार्ड नंबर दिल्यास आपल्या मोबाईल नंबरचा पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकल्यास हवी ती कागदपत्रे मिळवता येतील.
डिजी लॉकर सुविधेचा वापर कसा करावा –
1. डिजी लॉकर सुविधा मिळवण्यासाठी www.digitallocker.gov.in वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी 12 अंकी आधारकार्ड क्रमांक टाकून sign up करावे.
2. त्यानंतर आपण आधारकार्ड काढतेवेळी जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे, त्या नंबरवर एक वन टाईम पासवर्ड (OTP) येईल. हा पासवर्ड वापरुन व्हॅलिडेट OTP वर क्लिक करावे.
3. वरील क्रिया पूर्ण झाल्यावर नागरिकास 6 अंकी पिन क्रमांक तयार करावा लागतो. हा पिन क्रमांक कायमस्वरूपी असतो.
4. हा कायमस्वरूपी पिन वापरुन व्हॅलिडेट पिनवर क्लिक केल्यास नागरिकांचा डिजी लॉकर तयार होतो.
*डिजी लॉकरमधील डॉक्युमेंट्स फक्त PDF, JPEG, PNG, BMP किंवा GIF या मध्येच असावी लागतात.
Must Read (नक्की वाचा):
श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन (ShyamaPrasad Mukharji Rurban Mission – SPMRM)