ज्ञानपीठ पुरस्कार 2015 बद्दल माहिती
ज्ञानपीठ पुरस्कार 2015 बद्दल माहिती
- प्रसिद्ध गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांना 2015 चा हा पुरस्कार मिळाला.
- हा 51 वा ज्ञानपीठ पुरस्कार होय.
- 11 लाख रुपये रोख, सरस्वतीची प्रतिमा आरि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- रघुवीर चौधरी हे गांधीवादी कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 5 डिसेंबर 1938 रोजी गांधीनगर जवळ बापुपुरा येथे झाला.
- 1977 साली ‘उप्रवास कथायत्री’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
- रघुवीर चौधरी यांच्यापूर्वी गुजरातीमध्ये उमाशंकर जोशी (1967), पन्नालाल पटेल (1985) आणि राजेंद्र शाह (2001) यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे रघुवीर चौधरी हे देशातील 56 वे तर चौधे गुजराती लेखक आहेत.
- गुजराती साहित्य परिषदेचे ट्रस्टी व अध्यक्ष, साहित्य अकादमीचे कार्यकारी परिषदेचे सदस्य ‘प्रेस कौन्सिल’ ऑफ इंडियाचे सदस्य, 25 व्या भारतीय चित्रपट महोत्सवाचे ज्युरी मेंबर ही त्यांनी पदे भूषविली आहेत.
- रणजितराम सुवर्णपदक, मुंशी पुरस्कार, उमा-स्नेह रश्मी पारितोषिक, नर्मदा पुरस्कार, इत्यादी त्यांना पुरस्कार मिळाले आहेत.
- तमाशा (1965), वृक्ष पतन्मा (1985), अर्मिता (1965), रुद्रमहालया (1978), सोमतीर्थ (1996), वेणु वात्सल (1967) पूर्वरंग, लागणी (1976) एक दाग अलग बे दाग पच्छल (2009) उर्पवास, अहवास, अंतर्वास, कादंबर्या या कांदबर्या प्रसिद्ध आहेत.
- संदेश, जन्मभूमी, दिव्य भास्कर, निरीक्षक, अशा विविध दैनिकामध्ये स्तंभलेखक म्हणून लिखाण केले.