एकात्मिक बाल विकास सेवा योजना

एकात्मिक बाल विकास सेवा योजना

  • ग्रामीण, आदिवासी व झोपडपट्टी भागातील शालेयपूर्व बालकांची योग्य वाढ व विकास साधण्यासाठी, एकात्मिक सेवा पुरविणे ही एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
  • या योजनेंतर्गत शालेयपूर्व बालके, गर्भवती महिला व स्तनदा मतांचे आरोग्य व पोषण स्थिती सुधारण्यासाठी लसीकरण, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, पोषण व आरोग्य शिक्षण आणि शालेय पूर्व शिक्षण अशा मूलभूत सेवा पुरविल्या जातात.
  • हा कार्यक्रम 97,462 अंगणवाडया 10,901 मिनी अंगणवाडया आणि 553 बालविकास प्रकल्पामार्फत (तालुका/गत पातळीवर) राबविला जातो.

पोषण कार्यक्रम :-

  • बालके, गर्भवती महिला व स्तनदा माता यांच्या पोषण विषयक किमान गरजा भागविण्यासाठी व त्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पूरक पोषण आहार हा कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतेर्गत राबविण्यात येतो.
  • पूरक पोषण कार्यक्रमांतर्गत समाजातील मागासलेल्या घटकांतील सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना पोषण आहार देणे, गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता यांचे आरोग्य सुधारणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.
  • दुर्गम व संवेदनशील भागातील कुपोषण नियंत्रित करून अर्भक मृत्युदर कमी करणे हे सुद्धा या योजनेचे एक उद्दिष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार, सन 2010-11 पासून बालकांचे योग्य वजनाची, कमी वजनाची व अति कमी वजनाची बालके असे वर्गीकरण करण्यात येते.
  • बालकांची (0 ते 5 वर्ष) पोषण श्रेणीनिहाय टक्केवारी खालील तक्ता मध्ये दिले आहे.

ekatmik bal vikas seva yojana image 1
ekatmik bal vikas seva yojana image 2

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.