गतीविषयक नियम (All Rules about Motion)
गतीविषयक नियम :
गती :
- जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते, तेव्हा ती वस्तु गतिमान आहे असे म्हणतात.
- आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो.
- गती आपोआप सुरू होत नाही अथवा थांबत नाही.
Must Read (नक्की वाचा):
बल :
- स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.
- वस्तूची गती किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी बलाचा उपयोग होतो.
- बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.
- बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.
- बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.
- वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.
संतुलित बल :
- जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होणार्या दोन बलांचे परिणाम सारखे आणि दिशा विरुद्ध असतात, तेव्हा वस्तूवर प्रयुक्त होणारे एकूण बल शून्य असते.
- दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.
- संतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.
असंतुलित बल :
- असंतुलित बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो किंवा गतीची दिशा बदलते.
- वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.
- जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.
जडत्व :
- वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.
- जेव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.
जडत्वाचे प्रकार :
1. विराम अवस्थेतील जडत्व :
- वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, त्यास विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात.
- उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
2. गतीचे जडत्व :
- वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होवू शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात.
- उदा. चालत्या बसमधून उतरणारा प्रवासी पुढच्या दिशेने पडतो.
3. दिशेचे जडत्व :
- वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात.
- उदा. चाकूला धार करतांना धार लावण्याच्या चाकांच्या स्पर्शरेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात.
न्यूटनचे गतीविषयक नियम :
पहिला नियम :
उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
दूसरा नियम :
उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.
वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.
p=mv
संवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ
mv-mu/t
m(v-u)/t
तिसरा नियम :
उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.