गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती

गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती

  • पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.
  • गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.
  • गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.
  • गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.
  • गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.
  • गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते.
  • गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.
  • पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.
  • पंचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.
  • पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.
  • पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो.
  • पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.
  • पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते.
  • गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.
  • पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.
  • राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.
You might also like
2 Comments
  1. shridhar says

    Very useful and great work…

  2. Kishor mare says

    Saradhiv peth pune

Leave A Reply

Your email address will not be published.