मुंबई:
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मेगा भरतीच्या लेखी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. गट क व गट ड संवर्गातील पदांसाठी हि भरती होणार असून लेखी परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ व २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. आरोग्य विभागाच्या या परीक्षेसाठी हॉल तिकीट देखील उपलब्ध झाले आहे. हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे यासंबंधी माहिती खालील लेखात दिलेली आहे.आरोग्य विभागाची लेखी परीक्षा हि गट क संवर्गातील २७४० व गट ड या संवर्गातील ३५०० जागांसाठी होत आहे. म्हणजेच जवळपास एकूण सहा हजार दोनशे जागा आरोग्य विभागाच्या या भरती मध्ये भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी एकूण आठ लाखांपेक्षा जास्त अर्ज करण्यात आलेले आहेत.
हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या आरोग्य विभागाच्या वेबसाइटला तुम्हाला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर अर्ज करते वेळी मिळालेला युजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल.
लॉग इन केल्यानंतर हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची लिंक तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करताच हॉलतिकीट तुम्हाला डाऊनलोड करता येईल.
हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची लिंक पुढीलप्रमाणे – https://www.arogyabharti2021.in/
6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…
5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…
9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…
8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…
6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…
5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…