सातव्या पंचवार्षिक योजनेनंतरचा सुट्टीचा कालावधी
वार्षिक योजना (1990 – 92) :
सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरू करण्यात आली नही. देशातील राजकीय अस्थैर्र हे त्यामागील कारण होते.
त्याऐवजी दोन वार्षिक योजना राबविण्यात आल्या.
1. 1990-91
2. 1991-92
1990-92 दरम्यान अर्थव्यवस्थेत अनेक दुष्परिणाम निर्माण झाले होते.
1. व्यवहारतोलाचे संकट (BOP crisis)
2. परकीय चलनाचा अत्यल्प साठा
3. वाढती राजकोषीय तूट
4. चलनवाढीचा मोठा दर. उदा.1991-92 साली चलनवाढीचा वार्षिक दर 13.7% एवढा होता.
5. उद्योक क्षेत्रात मंदी
6. 1991-92 साली आर्थिक वाढीचा दर फक्त 0.9% एवढाच साध्य झाला.
7.21 जून,1991 या दिवशी पी.व्ही. नरसिंहराव यांचे सरकार अस्तीत्वात आले. नवीन सरकारने 1 एप्रिल,1992 रोजी आपली आठवी योजना सुरू केली.