इंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स
इंडियन इलेक्ट्रिसिटी (IE) रूल्स
- सप्लाय कंपनीच्या अर्थ किंवा न्यूट्रल शिवाय सर्व तारांना आयर्न ल्काड कट औट बसवावेत.
- जे ग्राहक मेडियम व हाय व्होल्टेज चा वापर करतात त्यांनी स्वत:ची अर्थींग करणे आवश्यक आहे.
- मेडियम किंवा हाय व्होल्टेज च्या ठिकाणी धोक्याची सूचना सहज दिसेल अशा प्रकारे इंग्रजी, हिंदी व स्थानीक भाषेत लावावी.
- जुन्या वायरिंग मधील बदल व नवीन वायरिंग परवानाधारक इलेक्ट्रिक कॉन्ट्राक्टर कडूनच करून घ्यावे.
- मंडलामध्ये प्लगपीन सॉकेट थ्री पीन प्लगचा वापर करावा.
- मंडलाची नवीन विद्युत पुरवठा करण्यापूर्वी आर्थींगची तपासणी करावी.
- मंडलातील लिकेज करंट लोड करंटच्या 1/5000 पेक्षा कमी असावा.
- ग्राहकाने नवीन मंडलाच्या सुरूवातीस ICDP किंवा ICTP इ. साधने सहज हाताळता येतील अशा ठिकाणी बसवावे.
- प्रत्येक उपमंडलात योग्य आकाराचे स्वतंत्र कटऔट बसवावे.
- पॉझीटीव्ह वार कोणत्याही परस्थितीत उघडे ठेवू नये.
- वायरिंग संबंधीत प्रत्येक धातूचे साधने/उपकरणे योग्य पद्धतीने अर्थ करावे.
- विद्युत पुरवठा, कंपनीच्या साधनांची देखभाल ग्राहकाने ठेवावी. उदा. एनर्जी मीटर इ.
- विद्युत कंपनीने स्वत:च्या मालकीच्या साधनांना सील केल्यास सीलची देखभाल ग्राहकाने करावी अधिकृत इसमाशिवाय सील तोडणे गुन्हा आहे.
- थ्री फेज फोर वायर पद्धतीतील न्यूट्रल कंडक्टर अर्थ करावा.
- D.C. विद्युत पुरवठ्याच्या तीनतारी पद्धतीत मधली वायर अर्थ करावी.
- इंस्टॉलेशन टेस्टिंग रिपोर्ट शिवाय मंडलास सप्लाय देवू नये.
- प्रत्येक स्वीच बोर्डच्या समोर 3’6” अंतर असावे.
- सर्व्हिस मेन्स सीडी शिवाय हाताला येणार नाही अशा उंच असाव्यात. त्या वेदरप्रूफ व वाटर प्रूफ असाव्यात.
- अर्थ कंडक्टर कॉपरचा असून मंडलातील जास्तीत जास्त प्रवाहाच्या दुप्पट प्रवाह सुरक्षीत वाहून नेईल असा असावा.
- मेडियम व्होल्टेजची वायरिंग करताना थ्रेडेड कॉन्ड्यूटर पाइप मधून करावे व कॉन्ड्यु पाइपला अर्थींग करावे.
- केसींग, कॅपींग, वायरिंग प्लास्टरमध्ये बुजवु नये व त्यांचा संबंध पाण्याशी येवू नये.
- लेड कव्हर वायरिंगला अर्थ करावे व त्याला लाकडाचे किंवा लोखंडाचे अच्छादन असावे.
- फ्लेग्झीबल वायरचा उपयोग टांगते दिवे, पोर्टेबल उपकरणे व तात्पुरत्या वायरिंग साठीच करावा.
- फ्लेग्झीबल वायर जेथे जोडल्या असतील तेथे कार्ड ग्रीप्सची (गाठीची) सोय करावी. ज्यामुळे कनेक्टिंग लोड/टर्मिनलवर तान येणार नाही.
- स्वीच प्लग जमिनीपासून 1.5 मीटर उंचीवर असावे.
- नवीन इंस्टॉलेशनची मेगर टेस्ट 1 मेगा ओहम पेक्षा कमी असल्यासच विद्युत पुरवठा करावा.
- हाउस वायरिंगमध्ये डिस्ट्रिब्युशन बोर्डच्या प्रत्येक सर्किटमध्ये 3 अॅम्पीयर पेक्षा कमी लोड असावा.
- फेज वायर नेहमी स्वीच मध्येच जोडावी.
- निगेटिव्ह वायरवर फ्यूज बसवू नये न्यूट्रल लिंक वापरावे.
- तीन फेज A.C. वायरिंग असेल तर फेजसाठी लाल, पिवळी व निळ्या रंगाची वायर व न्यूट्रलसाठी काळ्या रंगाची वायर वापरावी.
- D.C. पद्धतीत वायरिंग करताना भिन्न पोलॅरिटीचे वायर्स वेगवेगळ्या पाइप मधून न्यावे.
nice information