जननी सुरक्षा योजनेबद्दल माहिती
जननी सुरक्षा योजनेबद्दल माहिती
Must Read (नक्की वाचा):
- ग्रामीण व नागरी भागात संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देऊन त्याव्दारे दारिद्रय रेषेखालील, तसेच अनुसूचीत जाती व जमातीच्या कुटुंबांतील स्त्रियांमधील माता मृयू प्रमाण व अर्भक मृत्युदर कमी करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
- राज्यात 100 टक्के केंद्र पुरस्कृत जननी सुरक्षा योजना राबविली जात आहे.
- या योजनेअंतर्गत संस्थेमधील प्रसूतीनंतर 7 दिवसांच्या आत ग्रामीण भागातील रहिवासी लाभार्थ्यांस रु 700 व शहरी भागातील रहिवासी लाभार्थ्यांस रु 600 दिले जातात, तर कुशल दाईच्या (एसबीए) मदतीने घरी प्रसूत होणार्या ग्रामीण तसेच नागरी भागातील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांस रु 500 दिले जातात.
- सिझेरियनव्दारे प्रसूती झालेल्या लाभार्थ्यांस रु 1,500 पर्यंतच्या खर्चाची भरपाई दिली जाते.
- राज्यातील 2010-12 या कालावधितील माता मृत्यू प्रमाण 87 वरुण कमी होऊन 2011-13 मध्ये ते 68 झाले आहे.