काही महत्वाच्या पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती

काही महत्वाचे पुरस्काराबद्दल संपूर्ण माहिती

वि.दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार

  • ज्येष्ठ साहित्यीक आणि समीक्षक प्रा.रा.ग. जाधव यांना राज्यशासनाचा हा पुरस्कार 2015 वर्षाचा जाहीर झाला. (22 फेब्रु. 2016)
  • स्वरूप – पाच लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र
  • रा.ग. जाधव यांची प्रसिद्ध पुस्तके – निळी पहाट, संध्या समयीच्या गुजगोष्टी, सामाजिक संदर्भ, साहित्यांचे परिस्थिती विज्ञान 2004 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार

  • पुरस्कार जाहीर – 30 मार्च 2016
  • हा पुरस्कार 2012 -13 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा होय.
  • हे पुरस्कार राज्याच्या ग्रामविकास खात्यातर्फे दिले जातात.
  • प्रथम क्रमांक – कुंभेफळ ग्रामपंचायत (औरंगाबाद) (25 लाख रुपये)
  • व्दितीय क्रमांक – चांदोरे ग्रामपंचायत (ता. माणगाव जि. रायगड) व जातेगाव (ता. दापोली जि. रत्नागिरी) विभागून देण्यात आला.

 

व्ही. शांताराम पुरस्कार

  • राज्यशासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपटी व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट संकलक व्ही.एन. मयेकर यांना सर व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री अलका कुबल यांना प्रदान.
  • व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार पाच लाख, तर विशेष योगदान पुरस्कार तीन लाख रूपयांचा आहे.
  • व्ही.एन मयेकर यांनी घायल, घातक, दामिनी, वास्तव, अस्तित्व आदि चित्रपटाचे उत्कृष्ट संकलन केले आहे.
  • अलका कुबल यांनी माहेरची साडी, तुझ्या वाचुन, करमेना, दुर्गा आली घरा, माहेरचा आहेर, देवकी, नवसाचा पोर, स्त्रीधन असे कौटुंबिक चित्रपट केले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.