कौशल्य भारत योजना (Skill India Scheme)
कौशल्य भारत योजना (Skill India Scheme)
योजनेची सुरुवात – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 15 जुलै 2015 रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनी “कौशल्य भारत” कार्यक्रमाची सुरुवात नवी दिल्ली येथून करण्यात आली.
*कौशल्य भारत मिशन योजनेअंतर्गत चार इतर योजना (राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन, कौशल्य विकास आणि नवउद्योजकता राष्ट्रीय धोरण, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, कौशल्य कर्ज योजना) समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
Must Read (नक्की वाचा):
प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Crop Insurance Scheme -PMCIS)
*‘कौशल्य भारत -कुशल भारत’ योजना स्किल इंडियाचा एक भाग आहे.
*स्किल इंडियामार्फत देशातील 40 कोटी तरुणांना विविध योजनांअंतर्गत 2022 पर्यंत 500 प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
स्किल इंडियाचा मुख्य उद्देश – भारतीय तरुणांमधील कौशल्यांचा विकास करणे.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना –
1.ही योजना केंद्रीय कौशल्य विकास व नवउद्योजकता मंत्रालयाची मागणी व बक्षिसाधारित कौशल्य प्रशिक्षण योजना आहे.
2.या योजनेअंतर्गत चालू वर्षात 24 लाख व्यवसायिकांना सहभागी केले जाईल. त्यानंतर 2022 पर्यंत ही संख्या 40.2 कोटी पर्यंत वाढविण्यात येईल.
3.या योजनेअंतर्गत देशातील सर्व तरुण व्यवसायिकांना एकत्रित करून त्यांचे कौशल्य वाढवून त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
4.राष्ट्रीय कौशल्य विकासासाठी तरुण अधिक प्रमाणात जोडले जावेत यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करण्यात येईल.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत सहभाग नोंदणी मार्ग –
या योजनेत सरकारने अनेक टेलिकॉम कंपन्या जोडल्या आहेत. या टेलिकॉम कंपन्या SMS मार्फत या योजनेस सर्व लोकांपर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर SMS मध्ये एक टोल फ्री. नंबर देण्यात येईल. ज्यावर तरुणांने मिस कॉल करायचा आहे. मिल कॉलनंतर लगेच तरुणास कॉल येईल, यामार्फत तो तरुण IVR सुविधेस जोडला जाईल. त्यानंतर तरुणाने दिलेल्या माहितीन्सुयार स्वत:ची माहिती पाठवायची आहे. अशी माहिती साठवण केली जाईल. अशी माहिती मिळताच तरुणास जवळील ट्रेनिंग सेंटरशी जोडले जाऊन तेथून त्यास संपूर्ण माहिती प्राप्त होईल.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सदस्य-
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींबरोबर इतर तीन मंत्री या योजनेचे सदस्य असतील. त्याचबरोबर ग्रामीण विकास, कामगार, विकास, मानव संसाधन विकास कामगार आणि रोजगार, IT व निती आयोगाचे डेप्युटी चेअरमन इ. सहभागी असतील.
*प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणार्या प्रशिक्षणार्थीस सुमारे 8000 रु. चे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
*प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 34 लाख तरुणांना कौशल्य संपादन करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत 5000 रु. ते 1.5 लाख रु. कर्ज दिले जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krushi Sinchan Yojana (PMKSY)