केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार
केवल प्रयोगी अव्यय
Must Read (नक्की वाचा):
- हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो
उदा. अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.
- शोकदर्शक : आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे
उदा. अरेरे! खूप वाईट झाले.
- आश्चर्यदर्शक : ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या
उदा. अबब! केवढा मोठा साप
- प्रशंसादर्शक : छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी
उदा. शाब्बास! तू दिलेले काम पूर्ण केलेस.
- संमतीदर्शक : ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा
उदा. अछा! जा मग
- विरोधदर्शक : छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च
उदा. छे-छे! असे करू नकोस.
- तिरस्कारदर्शक : शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी
उदा. छी! ते मला नको
- संबोधनदर्शक : अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे
उदा. अहो! एकलत का ?
- मौनदर्शक : चुप, चुपचाप, गप, गुपचुप
उदा. चुप! जास्त बोलू नको