कुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय
कुष्ठरोगाबद्दल संपूर्ण माहिती व उपाय
Must Read (नक्की वाचा):
- कुष्ठरोग हा मंद गतीने लागण होणारा संसर्गजन्य आजार असून तो ‘मायकोबॅक्टेरियम लेप्री’ या जिवाणूमुळे होणारा आजार आहे.
- या रोगजंतूचा शोध डॉ.ए.हॅन्सन यांनी 1873 साली लावला. म्हणून या रोगास ‘हॅन्सन्स डिसीज’ असेही म्हणतात.
- कुष्ठरोगावरील औषध ‘डॅप्सोन’ (D.D.S.) हे 1940 मध्ये उपलब्ध झाले व त्यांचा वापर 1943 पासून सुरु झाला.
- कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची भारतामध्ये 1954-55 मध्ये सुरुवात झाली.
- 1980 मध्ये कुष्ठरोगावरील ‘बहुविध औषधोपचार पद्धती’ (MDT) सुरु झाली.
- 1983 मध्ये ‘राष्ट्रीय कुष्ठरोग दूरीकरण कार्यक्रम’ सुरु झाला.
- जगातल्या एकूण कुष्ठरुग्णांपैकी 1/3 रुग्ण एकटया भारतामध्ये आहेत.
- भारतात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, प. बंगाल, बिहार, ओरिसा या राज्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
- दर 10 हजार लोकसंख्येमध्ये एकपेक्षा कमी प्रमाण करणे म्हणजे ‘कुष्ठरोग दूरीकरण’ होय.
- कुष्ठरोगाचा प्रसार हा नजीकच्या संपर्कामुळे (तसेच हवेमार्फतही) होतो.
कुष्ठरोग लक्षणे :
- बधीर चट्टा ( न खाजणारा, न दुखवणारा)
- जाड, तेलकट त्वचा
- दुखऱ्या नसा
- त्वचेच्या जंतू परीक्षणात जंतू सापडणे.
- निदान – लक्षणांवरून निदान तसेच कानाच्या पाळीच्या त्वचेच्या भागाचे जंतू परीक्षण करतात.
कुष्ठरोगाचा प्रकार :
- सांसर्गिक (मल्टी बॅसिलरी) च. इ.(Multi Bacillary) (6 पेक्षा जास्त चट्टे/दोनपेक्षा जास्त दुखऱ्या नसा) औषधोपचार 12 ते 18 महिने असतो.
- असांसार्गिक (पॉसी बॅसिलरी) झ.इ.(Pauci Bacillary) (1 ते 5 चट्टे एक दुखरी नस) औषधोपचार 6 ते 9 महिने असतो.
- कुष्ठरोगावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही.
- कुष्ठरोग औषधोपचार पद्धतीत बहुविध औषधोपचार पद्धती MDT (Multi Drug Therapy) असे म्हणतात.
- कुष्ठरोग निवारण दिन – 30 जानेवारी (महात्मा गांधीनी निर्मुलनासाठी कार्य केल्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीदिनी साजरा करतात.)
- महाराष्ट्रामध्ये डॉ. बाबा आमटे यांचा ‘आनंदवन’ प्रकल्प (विदर्भामध्ये) कुष्ठरोगाबाबत सामाजिक कार्य करतो.
- कुष्ठरोग हा आनुवंशिक रोग नाही.
Must Read (नक्की वाचा):