महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा उदय
महाराष्ट्रातील राष्ट्रवाद :
उदयाची कारणे :
1. समान महसुली पद्धती – रयतवारी पद्धत – त्यामुळे जनतेच्या समस्या सारख्याच
2. पाश्चिमात्य शिक्षण – स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायप्रियता, कायद्याचे राज्य, लोकशाही, उदारमतवाद इ. कल्पनांचा परिचय आणि त्यातून राष्ट्रवादी भावना वाढीस
3. समाजसुधारकांचे कार्य – फुले, लोकहितवादी, रानडे, आगरकर – सामाजिक क्षेत्रात जागृती – त्यामुळे सामाजिक ऐक्य निर्माण झाले – राष्ट्रीय भावना वाढीस आली.
4. वृत्तपत्रे – दर्पण, प्रभाकर, केसरी, मराठा – यामुळे राजकीय, सामाजिक, धार्मिक जागृती निर्माण झाली.
5. दळणवळणाची साधने – रस्ते, रेल्वे, तारायंत्र, पोस्टखाते. यामुळे प्रांतातील दुरावा कमी होऊन लोक एकमेकांच्या अधिक जवळ आले – राष्ट्रवाद वाढीस
6. आर्थिक शोषण – दादाभाई नौरोजी, गोखले, रानडे
7. वंशश्रेष्ठत्वाचा अभिमान आणि Elbert Bill
8. धर्म सुधारणा चळवळीचा प्राभाव – प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज
9. रामोशी, कोळी, भिल्ल, यांचे उठाव यातून प्रेरणा मिळाली.
10. मध्यवर्गाचा उदय – शिक्षक, वकील, कारकून, पत्रकार सरकारी अधिकारी
या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी भावना वाढीस आली.
Very Nice Notes