मानवी हक्क संरक्षण कायदा : 1993 (प्रकरण 8) विषयी संपूर्ण माहिती

मानवी हक्क संरक्षण कायदा : 1993 (प्रकरण 8)
प्रकरण 8 : इतर
Must Read (नक्की वाचा):
- कलम 36 : आयोग किंवा राज्य मानवी हक्क आयोग यांच्या अधिकारीतेच्या अधीन नसणार्या बाबी
- कलम 37 : विशेष अन्वेषण पथकाची स्थापना
- कलम 38 : या कायद्यानुसार चांगला हेतु ठेवून केलेल्या कृतीला संरक्षण देण्यात येईल.
- कलम 39 : आयोगाचा, राज्य आयोगाचा प्रत्येक सदस्य भारतीय दंड संहिता (1860 चा 45) कलम 21 नुसार लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.
- कलम 40 : या कायद्यातील तरतुदी पार पाडण्यासाठी केंद्र शासनास अधिसूचनेव्दारे नियम करता येतील.
- कलम 41: या कायद्यातील तरतुदी पार पाडण्यासाठी राज्य शासनास अधिसूचनेव्दारे नियम करता येतील.
- कलम 42 : हा कायदा अमलात आणताना येणार्या अडचणी दूर करण्याचे अधिकार केंद्र शासनास आहेत. त्यानुसार केंद्र शासन राजपत्रात आदेश प्रसिद्ध करील.
हा कायदा अस्तित्वात असल्यापासून दोन वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर असा कोणताही आदेश काढता येणार नाही. - कलम 43: निरसन व व्यापक वृत्ती