मुंबई :
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA मध्ये 215 जागांसाठी नौकरी भरतीचे आयोजन करण्यात आले असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पाठविण्याची 17 एप्रिल 2020 हि अंतिम मुदत आहे. अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा झालेल्या उमेदवारांसाठी हि सुवर्णसंधी असून याचा सर्व उमेदवारांनी लाभ घेण्याची विनंत्री करण्यात आली आहे. इतर पदवी धारण केलेल्या विद्याथ्यांसाठी देखील काही पदे उपलब्ध आहेत. या भरतीविषयी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.स्टेशन मॅनेजर, चीफ ट्रॅफिक कंट्रोलर, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, पर्यवेक्षक ई. भरपूर पदांसाठी हि भरती होत असून त्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेची अट आहे. वयाची अट, शैक्षणिक पात्रता, रिक्त जागांचा तपशील ई. सर्व माहिती MMRDA ने प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक खाली दिली आहे.
जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MMRDA चे प्रादेशिक नियोजन आराखडा तयार करणे, प्रादेशिक महत्वाचे प्रकल्प तयार करणे व त्यास अर्थ सहाय्य् देणे आणि एकूण दूरदृष्टि ठेवून नियोजन करण्याचे प्राधिकरण स्थापनेपासूनच कार्यरत आहे. प्रादेशिक नियोजन आराखडा, मुंबई महानगर प्रदेशाच्या शाश्वत विकासाची दिशा दाखवितो. मुंबई महानगर प्रदेशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करुन जीवनमान सुधारणे आणि प्रदेशाला आर्थिक चालना देणे हा प्राधिकरणाच्या स्थापनेमागील उद्देश होता.
नियोजन आराखडे तयार करणे, धोरणे आणि कार्यक्रम आखणे, प्रकल्पाची अंमलबजावणी करणे आणि प्रदेशामध्ये गुंतवणुकीला दिशा देणे ही प्राधिकरणाची मुख्य जबाबदारी आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या काही महत्वाच्या जबाबदाऱ्या अशा :
प्रादेशिक विकास आराखडे बनविणे.
महत्वपूर्ण प्रादेशिक प्रकल्पांना अर्थसहाय्य् देणे
स्थानिक संस्था आणि त्यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मदत करणे.
मुंबई महानगर प्रदेशामधील विविध प्रकल्प अथवा योजना यांच्या अंमलबजावणीसाठी समन्वय साधणे.
मुंबई महानगर प्रदेशावर विपरीत परिणाम होऊ शकेल अशा विकासास प्रतिबंध घालणे इ.
थोडक्यात, महानगर प्रदेशामध्ये महत्वपूर्ण प्रकल्पांचे संकल्पन करणे, त्यांना दिशा दाखविणे आणि त्यांच्यावर देखरेख ठेऊन नवीन विकास केंद्रे निर्माण करणे आणि वाहतूक, गृह निर्माण, पाणी पुरवठा आणि पर्यावरणामध्ये सुधारणा करणे अशी प्राधिकरणाची जबाबदारी आहे.
6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…
5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…
9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…
8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…
6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…
5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…