मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मधील गैर कार्यकारी अधिकारी पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये नुकतीच महाभरती झाली होती. त्या महाभरतीची परीक्षा झाली असून त्याचा निकाल जाहीर झाला आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये काही दिवसांपूर्वी नौकरी भरतीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १०५३ जागांसाठी महाराष्ट्र राज्यातील लाखो तरुणांनी अर्ज करून परीक्षा दिली होती. आजच MMRDA परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे व त्यासंबंधी सर्व माहिती खाली दिलेली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बद्दल थोडीशी माहिती
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) हे मुंबईतील एकूण ४३५५ चौ.कि.मी क्षेत्रात कार्यरत आहे. या क्षेत्रामध्ये बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी- निजामपूर, वसई-विरार आणि मिरा भाईंदर या 8 महानगरपालिका आणि अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर, माथेरान,कर्जत, पनवेल, खोपोली, पेण, उरण व अलिबाग या 9 नगरपरिषदा तसेच ठाणे व रायगड जिल्हयांतील 1000 च्यावरील खेड्यांचा समावेश आहे.
कोणकोणत्या पदांसाठी MMRDA मध्ये भरती झाली होती?
खालील पदांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये नौकरी भरती झाली होती.
- Commercial Assistant
- Finance Assistant
- HR Assistant II
- Junior Engineer (S & T)
- Junior Engineer (Stores)
- Junior Engineer
- Safety Supervisor-II
- Station Controller
- Traffic Controller
- Train Operator (Shunting)
निकाल कसा बघावा?
निकाल बघण्यासाठी तुम्हाला MMRDA च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यातील नौकरी संदर्भामध्ये या निकालाच्या PDF स्वरुपात डॉक्युमेंट्स आहेत, त्या तुम्ही दिलेल्या पदांच्या परीक्षेनुसार डाउनलोड करू शकता.
येथे क्लिक करून सुद्धा तुम्ही निकाल डाउनलोड करू शकता.