अर्थ व त्याचे प्रकार
Must Read (नक्की वाचा):
- क्रियापदाचा सर्वात सोपा उपयोग म्हणजे एखाधा वस्तुस्थितीविषयी विधान करण्यासाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी
उदा.
- I write to my brother every week.
- Who wrote that letter?
- परंतु आज्ञा किंवा अधिकार (command) व्यक्त करण्यासाठी देखील क्रियापद वापरता येते.
उदा. Write neatly.
- अथवा केवळ कल्पना किंवा भावना (supposition) व्यक्त करण्यासाठी क्रियापद वापरता येते.
- If I were you I would not do it.
- एखादी क्रिया व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळया अर्थाने किंवा पद्धतीने क्रियापद वापरता येते. यालाच ‘अर्थ’ (moods) असे म्हणतात. (लॅटिनमध्ये Modus म्हणजे पद्धत) (manner – पद्धत किंवा तर्हा.)
व्याख्या –
- क्रियापदाने दर्शविलेली क्रिया ज्या अर्थाचा किंवा पद्धतीचा निर्देश करते त्याला ‘अर्थ’ (mood) असे म्हणतात.
- इंग्रजीत तीन प्रकराचे अर्थ (Mood) आहेत.
- Indicative – विधानार्थ (विधान+अर्थ)
- Imperative – आज्ञार्थ (आज्ञा+अर्थ)
- Subjunctive – संकेतार्थ (संकेत+अर्थ)
विधानार्थ (Indicative Mood) :
- खालील गोष्टींसाठी विधानार्थ (Indicative) चा उपयोग होतो.
1. एखाधा वस्तुस्थितीचे (वस्तुविषयी) विधान करण्यासाठी.
उदा.
- Rama goes to school daily.
- We are taught Arithmetic.
- He writes legibly.
- Napoleon died at St. Helena.
- The child is alive.
2. प्रश्न विचारण्यासाठी
उदा.
- Have you found your book?
- Are you well?
- यातील प्रत्येक वाक्यातील तिरक्या अक्षरात लिहिलेली क्रियापदे विधानार्थ आहेत असे म्हणतात.
- एखादी कल्पना किंवा भावना वस्तुस्थिती आहे असे तात्पुरते गृहीत धरले (मानले) जाते तेव्हा ती व्यक्त करण्यासाठी देखील विधानार्थ वापरता येते.
उदा.
- If[=assuming as a fact that] I am to be a beggar, it shall never make me a rascal.
- If it rains, I shall stay at home.[Assuming as a fact that it will rain, etc.]
- If my friend wants it, I shall give it to him.[Assuming as a fact that my friend wants it, etc.]
- If he is the ring-leger, he deserves to be punished.[Assuming as a fact that he is the ring-leader, etc.]
- जे क्रियापद वस्तुस्थितीचे विधान करण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी किंवा एखादी कल्पना किंवा भावना वस्तुस्थितीच आहे असे तात्पुरते मानून केलेल्या विधानासाठी वापरतात तेव्हा ते क्रियापद विधानार्थात आहे असे म्हणतात.
आज्ञार्थ (Imperative Mood) :
- आज्ञार्थ (Imperative Mood) खालील गोष्टी व्यक्त करण्यासाठी वापरतात.
1. हुकूम किंवा आज्ञा
उदा. (A command)
- Wait there
- Come here.
- Open you book at page7.
2. आग्रहपूर्वक विनंती
उदा. (An exhoratation)
- Be steady.
- Take care of your health.
- Try to do better.
3. विनवणी किंवा प्रार्थना
उदा.(An entreaty or prayer)
- Have mercy upon us.
- Give us this day our daily bread.
- यामध्ये प्रत्येक वाक्यातील तिरक्या अक्षरात लिहिलेले क्रियापद आज्ञार्थात आहे असे म्हणतात.
- जे क्रियापद आज्ञा, आग्रहपूर्वक विनंती, विनवणी किंवा प्रार्थना व्यक्त करते ते आज्ञार्थ (Imperative Mood) असते.
टीप –
1. आज्ञार्थाचा (Imperative Mood) उपयोग फक्त व्दितीया पुरुषातच होतो कारण ज्याला आज्ञा केली आहे ती व्यक्ति जिच्याशी बोलले जाते ती असावी लागते. परंतु प्रथम आणि तृतीय पुरुषात ‘Let’ या साहाय्यकारी क्रियापदाचा (Auxiliary) वापर करून याच प्रकरचा अर्थ व्यक्त करता येतो.
उदा.
Let me go.
Let us go.
Let him go.
Let them go.
2. आज्ञार्थातील (Imperative Mood) क्रियापदाचा कर्ता you हा सर्वसाधारणपणे वगळतात.
संकेतार्थ (Subjunctive Mood)
संकेतार्थातील रुपे खालीलप्रमाणे आहेत. –
वर्तमान संकेतार्थ भूत संकेतार्थ
(Present Subjunctive) (Past Subjunctive)
the verb ‘be’ other verbs the verb ‘be’ other verbs
I be I speak I were I spoke
We be We speak We were We spoke
You be You speak You were You spoke
He be He speak He were He spoke
They be They speak They were They spoke
- आजकाल इंग्रजीत संकेतार्थ क्वचितच अस्तित्वात आहे.
- वर्तमान संकेतार्थ (Present Subjunctive) खालील प्रकारात येतो.
1. परंपरागत वाक्यांशा (phrase) मध्ये, ज्यामध्ये इच्छा किंवा आशा व्यक्त केली आहे.
उदा.
- God bless you!
- God save the King!
- Heaven help us!
2. औपचारिक इंग्रजीत इच्छा (desire), हेतु (intention) निश्चय (resolution) इत्यादी व्यक्त करणार्या क्रियापदावर अवलंबून असलेल्या नाम उपवाक्यात (clause)
उदा.
- I move that Mr. Gupta be appionted Chairman.
- It is suggested that a ring road be built to relieve the congestion.
- We recommended that the subscription be increased to ten rupees.
- भूत संकेतार्थ (Past subjunctive) खालील गोष्टीत वापरतात.
1. ‘Whish’ या क्रियापदानंतर, काल्पनिक/आभासयुक्त (unreal) किंवा वास्तवाच्या विरूढ (contrary of fact) स्थिती दर्शविण्यासाठी
उदा.
- I wish I knew his name(=I’m sorry I don’t know his name.)
- Ii wish I were a millionaire.
- She wishes the car belonged to you.
2. If या क्रियापदानंतर कल्पना (unreality) किंवा अशक्यता (improbability) व्यक्त करण्यासाठी.
उदा.
- If I were you I should not do that (but I am not you, and never can be.)
- If we started now we would be in time (but we cannot start now.)
3. ‘As if/’as though‘ नंतर कल्पना किंवा अशक्यकता दर्शविण्यासाठी.
उदा.
- He orders me about as if I were his wife (but he is not).
- He walks as though he were drunk (but he is not).
4. It is time+subject नंतर ‘उशीर झाला आहे’ या अर्थी
उदा. It is time we started.
5. ‘I would rather+subject’ नंतर प्राधान्य दर्शविण्यासाठी.
उदा.
- I would rather you went by air (=1 should prefer you to go by air).
- They would rather you paid them by cheque.