मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 2)
मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 2)
- महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोणती मृदा आढळते? – खारी माती.
- कोकण विभागात कोणती मृदा आढळते? – तांबडी-जांभी.
- लोह व अल्युमिनीअमचे अधिक प्रमाण असणारी महाराष्ट्रातील माती कोणती? – जांभी.
- रत्नागिरी जिल्ह्यात कोणती माती आढळते? – जांभी.
- महाष्ट्रात कोणत्या ठिकाणी क्रोमाइट सापडते? – रत्नागिरी.
- डोलोमाईट महाष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? – रत्नागिरी.
- गरम पाण्याचे झरे असलेले साव व पाली कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
- गरम पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले राजापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? – रत्नागिरी.
- काजुसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? – मालवण.
- अलिबाग कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? – कलिंगड.
- वसई कशासाठी प्रसिद्ध आहे? – केळी.
- चिकूसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते? – डहाणू.
- लिची ही फळझाडे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? – ठाणे.
- कोकणात प्रायोगिक तत्वावर कशाची लागवड करण्यात आलेली आहे? – निलगिरी.
- सर्वाधिक तांदुळ पिकवणारा जिल्हा कोणता? – रायगड.
- सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता? – रत्नागिरी.
- कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांपेक्षा पुरुषाचे प्रमणा जास्त आहे? – मुंबई शहर.
- सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? – मुंबई उपनगर.
- भात व मासे महाराष्ट्रातील कोणत्या लोकांचे अन्न आहे? – कोकणी.
- रायगड जिल्ह्यातील आदिवासी जमात कोणती? – कातकरी.
- महादेव कोळी, वारली, पारधी, ठाकर, भिल्ल या जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? – ठाणे.
- आगरी आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? – ठाणे.
- अप्सरा-अनुभट्टी कोठे आहे? – तारापूर.
- भारतातील अॅटोमिक पॉवर प्लॅट कोणत्या ठिकाणी आहे? – तारापूर.
- तारापूर अणू वीज केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? – 1969.
- मुंबई-गोवा मार्गावर कोणते शहर आहे? – वसई.
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 हा कोणता मार्ग म्हणून ओळखला जातो? – मुंबई-गोवा.
- रत्नागिरी-मुंबई रेल्वे मार्ग कोणत्या नावाने ओळखला जातो? – कोकण रेल्वे.
- नेरळ-माथेरान हा कोणत्या प्रकारचा मार्ग आहे? – नॅरोगेज.
- कर्जत-खोपोली कोणत्या प्रकारचा रेल्वे मार्ग आहे? – ब्रॉडगेज.
- वसई रोड-दिवा जंक्शन ते रोहा हा कोणत्या प्रकारचा रेल्वे मार्ग आहे? – ब्रॉडगेज.
- चर्चगेट-विरार उपनगर मार्ग कोणत्या रेल्वे विभागात मोडतो? – पश्चिम.
- कोणते विमानतळ मुंबईत आहे? – सांताक्रुज.
- रेड्डी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? – सिंधुदुर्ग.
- मुंबई बंदरावरील तान कमी करण्यासाठी कोणते कृत्रिम बंदर तयार केले गेले आहे? – न्हावा शेवा.
- महाराष्ट्रात सध्या एकूण लहान-मोठी मिळून किती बंदरे आहेत? – 52.
- देशातील व्यापारापैकी किती टक्के व्यापार मुंबईत चालतो? – 25%.
- महाराष्ट्राचे सर्वात उपयुक्त बंदर (नैसर्गिक) कोणते? – मुंबई.
- महाराष्ट्राचे सर्वात बंदर कोणते? – मुंबई.
- मुंबई बंदर सर्वात उपयुक्त आहे कारण – दळणवळणासाठी भरपूर साधने व रस्त्याचे जाळे मोठे आहे.
- कोणत्या मोसमात कोकणातील बंदरे बंद असतात? – पावसाळ्यात.
- खनिज निर्यातीसाठी कोकणातील कोणते बंदर विकसीत केले गेले आहे? – रेड्डी.
- लाकडी खेळणीसाठी कोणते गाव प्रसिद्ध आहे? – सावंतवाडी.
- मासेमारीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? – पहिल्या.
- सर्वाधिक मासेमारी कोणत्या पाण्यात चालते? – खार्या.
- राष्ट्रीय केमीकल फर्टीलायझर प्रकल्प कोठे आहे? – पनवेल.
- मिठागरे असलेले जिल्हे कोणते? – रायगड, रत्नागिरी, ठाणे.
- रत्नागिरी किनार्याजवळ मिळणारे मासे कोणत्या प्रकारचे असतात? – कोळंबी.
- महाराष्ट्रात मत्सबीज व्यवसाय कधी सुरू झाला? – मे 1963.
- रायगड जिल्ह्यातील महत्वपूर्ण खत प्रकल्प कोणता? – थळवायशेत.