नागपुर प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

नागपुर प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

1. नागपुर जिल्हा :
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – नागपुर
  • लोकसंख्या – 46,53,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 15 – काटोल, सावणेर, रामटेक, हिंगणा, नागपुर (ग्रामीण), नागपुर (शहर), उमरेड, कामठी, नरखेड, कळमेश्वर, मौदा, भिवापुर, कुही, पारशीवणी, देवलापूर.
  • सीमा – नागपुर जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेशातील छिदवाडा व शिवणी हे जिल्हे असून वायव्येस अमरावती जिल्हा आहे. दक्षिणेस चंद्रपुर जिल्हा, पूर्वेस भंडारा जिल्हा आणि पश्चिमेस वर्धा जिल्हा आहे.
नागपुर जिल्हा विशेष –
  • नाग नदीच्या काठी असलेल्या या शहराला नाग नदीवरून नागपुर हे नाव पडले. हे शहर मराठा राजवटीत भोसल्यांच्या राजधांनीचे शहर होते. येशील दीक्षाभूमी हे स्थान प्रसिध्द आहे.
  • महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. संत्र्यासाठी देशातच नव्हे तर विदेशात सुध्दा प्रसिध्द आहे.
  • 4 फेब्रुवारी 2004 रोजी नागपुर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला.
  • नागपुर विद्यापीठाचे नामकरण ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ’ असे करण्यात आले.
नागपुर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • नागपुर – महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. येथे महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. येथील सीताबर्डीचा किल्ला पाहण्यासारखा आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ, निरी; रमन विज्ञान केंद्र प्रसिध्द आहे.
  • कामठी – दगडी कोळश्याच्या खाणीसाठी प्रसिध्द आहे. येथे सैनिकी शिक्षण देणारे विद्यालय असून अलीकडे येथील ड्रॅगण पॅलेस टेम्पल प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित होत आहे.
  • काटोल – येथे लिंबू या फळाचे संशोधन केंद्र आहे.
  • सावनेर – दगडी कोळश्याच्या खाणी आहेत.
  • रामटेक – येथेच महाकवी कालिदासांनी मेघदूत हे काव्य लिहिले होते. येथे महाकवी कालिदास स्मारक आहे.
  • अंभोरा – येथील चैतन्येश्वराचे व हरिहर स्वामींचे मंदिर प्रसिध्द आहे.
  • कळमेश्वर – संत्रा व मिरचीच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे.
  • भिवापुर – मिरचीच्या बाजारासाठी प्रसिध्द आहे.
नागपुर जिल्ह्याची वैशिष्ट्ये –
  • 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौध्द धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतली. हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे धर्मांतर होय.
  • याच स्थळाला दीक्षाभूमी म्हणून ओळखल्या जाते.
  • कामठी येथील सर्वदूर गाजलेले ड्रॅगण पॅलेस हे बौध्द धम्म मंदिराचे 23 नोव्हेंबर 1999 ला उद्घाटन झाले. अतिशय देखणी वास्तु असणारे हे मंदिर ड्रॅगण पॅलेस मंदिर म्हणून ओळखले जाते.
2. भंडारा जिल्हा :
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – भंडारा
  • लोकसंख्या – 11,98,810 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 7 – भंडारा, साकोली, पवनी, मोहाडी, तुमसर, लाखांदूर, लाखणी.
  • शेजारी जिल्हे – भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेश असून पूर्वेस गोंदिया जिल्हा आहे. दक्षिणेस चंद्रपुर जिल्हा आणि पश्चिमेस नागपुर जिल्हा आहे.
भंडारा जिल्हा विशेष –
  • भांड्याचे शहर म्हणून भंडारा अशी या शहाराच्या नावाशी उत्पती मांडली जाते. भाण हा शब्द भांडी या अर्थी वापरला जात असावा. असे अनुमान निघते.
  • भाण शब्दावरून भाणारा आणि त्यावरून पुढे भंडारा हा शब्द असावा. भात हे मुख्य पीक.
  • तलावाचा जिल्हा म्हणून प्रसिध्द. येथील पितळी भांडी प्रसिध्द आहे.
भंडारा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • भंडारा – गवळी राजवटीत बाधलेला प्राचीन किल्ला शहरात आहे. पितळी भांडी प्रसिद्ध आहेत. येथे अलोनीबाबा या संताचा मठ आहे. भंडार्‍याचे निलभट्ट यांच्या घरी चक्रधर स्वामींनी मुक्काम केले आहे.
  • तुमसर – तांदळची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. येथे मँगनीज शुध्द करण्याचा कारखाना आहे.
  • भंडारा रोड – येथे मोठा पोलाद प्रकल्प आहे.
  • जवाहरनगर – युध्द साहित्य निर्मितीचा मोठा कारखाना आहे.
  • अंबागड – येथील मध्ययुगीन किल्ला प्रसिध्द असून तो बख्त बुलंदशाह या गोंड राजाने बांधला आहे.
  • पवनी – हे स्थळ प्राचीन काळी बौध्द धर्मियांचे महत्वाचे क्षेत्र होते. येथे बौध्द कालीन स्तूप आहे.
  • अड्याळ – येथील हनुमान मंदिर प्रसिध्द आहे.
3. गोंदिया जिल्हा
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – गोंदिया
  • लोकसंख्या – 13,22,331 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 8 – गोंदिया , तिरोडा , गोरेगाव , आमगाव , देवरी, सालेकसा, अर्जुनी (मोरेगाव), सडक -अर्जुनी
  • सीमा – गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश असून पूर्वेस छत्तीसगढ राज्य आहे. दक्षिणेस गडचिरोली जिल्हा आणि पश्चिमेस भंडारा जिल्हा आहे.
गोंदिया जिल्हा विशेष –
  • 1 मे 1999 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य प्रसिध्द आहे.
  • भाताच्या गीराण्याकरिता गोर्दिया प्रसिध्द आहे. तसेच तेंदूपाने गोळा करणे व त्यापासून विडया बनविणे हा उद्योग मोठया प्रमाणात चालतो.
  • भवभूती हा प्राचीन भारतीय साहित्यिक व नाटककार याच जिल्ह्याचा सुपुत्र होता.
गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • गोंदिया – येथील भाताच्या गिरण्या व लाकूडकटाई प्रसिद्ध आहे.
  • तिरोडा – तांदळाची बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे.
  • आमगाव – प्रसिध्द संस्कृत नाटककार भवभूती यांचे स्मारक येथे आहे.
  • नवेगाव बांध – येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन केंद्र म्हणून प्रसिध्द आहे.
  • प्रतापगड – येथील प्राचीन किल्ला व शिवमंदिर प्रसिध्द आहे.
  • नागझीरा – हे स्थळ अभयारण्य म्हणून प्रसिध्द आहे.
  • सडक अर्जुनी – बांबुच्या कलात्मक आणि विविधोपयोगी वस्तू निर्मितीचे केंद्र.
4. वर्धा जिल्हा :
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – वर्धा
  • लोकसंख्या – 12,96,157 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 8 – आर्वी, वर्धा , हिंगणघाट, सेलू, देवळी , समुद्रपूर , आष्टी, कारंजा.
  • सीमा – वर्धा जिल्ह्याच्या उत्तर व पूर्वेस नागपूर जिल्हा आहे. आग्नेयेस चंद्रपूर जिल्हा, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा आणि पश्चिमेस अमरावती जिल्हा आहे.
वर्धा जिल्हा विशेष –
  • वर्धा या शहराचे पूर्वीचे नाव पालकवाडी असे होते. पालकवाडी नावाच्या छोट्या वस्तीचा नियोजनबध्द विकास होऊन आजचे वर्धा शहर अस्तित्वात आले आहे.
  • गांधी जिल्हा म्हणून ओळख.
  • महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र कार्यरत आहे.
  • महात्मा गांधी ज्या झोपडीत राहत होते ती झोपडी ‘बापू-कुटी’आजही सेवाग्राम येथे पहावयास मिळते.
  • पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेला ‘परमधाम आश्रम प्रासिद्ध आहे.
वर्धा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • वर्धा – जवळच असलेले  सेवाग्राम येथे महात्मा गांधीजींचा व पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेला ‘परमधाम आश्रम प्रासिद्ध आहे. राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय येथे आहे. वर्धा येथील अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ ही संस्था प्रसिध्द आहे.
  • हिंगण घाट – येथील जैन मंदिर व मल्हारी – मार्तंड मंदिर प्रसिध्द आहे.
  • आर्वी – येथील काचेचे जैन मंदिर प्रसिध्द आहे. आर्वीला संतांची आर्वी म्हणून ओळखतात.
  • आष्टी – 1942 च्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात अनेक सत्याग्रही मारल्या गेले.
  • पवनार – विनोबा भावेंनी स्थापन केलेला परमधाम आश्रम आहे.
  • सेवाग्राम – सेवाग्राम येथे ‘बापू-कुटी’ प्रसिध्द आहे.
  • पुलगाव – लष्करी सामग्रीचे कोठार यासाठी प्रसिध्द आहे.
  • केळझर – स्फोटक द्रवाचा कारखाना.
  • ढगा – हे गाव कारंजा तालुक्यात येत असून येथे शिवलिंग असलेली प्राचीन मंदिर आहे.
5. गडचिरोली जिल्हा :
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – गडचिरोली
  • लोकसंख्या – 10,71,795 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 12 – कुरखेडा, अहेरी, धानोरा, सिरोंचा, कोरची, आरमोरी, चामोर्शी, एटापल्ली, गडचिरोली, भामरागड, मुलचेरा, देसाईगंज.
  • सीमा – गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेस भंडारा जिल्हा व पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे. दक्षिणेस आंध्रप्रदेश आणि पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे.
गडचिरोली जिल्हा विशेष –
  • चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून 26 ऑगस्ट 1982 रोजी हा जिल्हा अस्तित्वात आला.
  • गडचिरोली हा आदिवासी जिल्हा व नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गोंड ही येथील प्रमुख
  • आदिवासी जमात होय. या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता व साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे.
  • राज्यातील ओद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला जिल्हा म्हणून गडचीरोलीला ओळखले जाते.
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • हेमलकसा- अपंग व कुष्टरोगी यांच्या उपचार व पुनर्वसनाकरिता बाबा आमटे व त्यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे यांनी एक प्रकल्प सुरु केला आहे.
  • सिरोंचा – येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ पर्वणी यात्रा भरते.
  • आरमोरी – या गावात त्रिदल पध्दतीचे शैव मंदिर आहे. हे मंदिर गोंड राजा हरीश्र्चंद्राने बांधले जो वैरागडचा किल्लेदार होता. नंतर हा भाग रघुजी भोसलेच्या ताब्यात गेला.
  • शोधग्राम – डॉ. अभय बंग व त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांचे येथे आरोग्य केंद्र आहे.
  • वैरागड – खोब्रागडी व सातनाला नद्यांच्या संगमावर आरमोरी तालुक्यात हा प्रसिध्द किल्ला आहे. विराट राजाची ही राजधानी . हा किल्ला राजा बाबाजी बल्लार शहा याने 1572 मध्ये बांधला असे मानतात.
6. चंद्रपूर जिल्हा :
  • जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – चंद्रपूर
  • क्षेत्रफळ – 11,443 चौ.कि.मी.
  • लोकसंख्या – 21,94,162 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
  • तालुके – 15 – गोंडपिंपरी, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, भद्रावती, वरोरा, चंद्रपुर, राजुरा, चिमुर, नागभीड, मूल, जिवती, बल्लारपूर, पोंभूर्णा, सावली, कोपरना.
  • सीमा – चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तरेस भंडारा व नागपुर हे जिल्हे व पूर्वेस गडचिरोली जिल्हा आहे. दक्षिणेस आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्हा आणि पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, वायव्येस वर्धा जिल्हा आहे.
चंद्रपूर जिल्हा विशेष –
  • गोंड राजे व ब्रिटिश राजवटीत तसेच स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष हा जिल्हा चांदा नावाने ओळखला जात होता. पुढे त्याचे नवा चंद्रपुर असे झाले.
  • चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक सीमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून गणला जातो. येथे राज्यातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प आहे.
  • या जिल्ह्यातील कोळसा, सीमेंट व बल्लापूर येथील पेपर मिल प्रसिद्ध आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –
  • चंद्रपूर – गोंड राज्याची राजधानी. चंद्र्पुरातील महाकालीचे मंदिर व गोंडकालीन किल्ला प्रेक्षणीय आहे.
  • बल्लारपूर – औष्णिक विधुत निर्मिती केंद्र आहे. दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
  • भद्रावती – युद्धसाहित्यनिर्मितीच्या कारखान्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील विजासन टेकडीवर बोद्धकालीन लेणी आहेत. जवळच ताडोबा राष्ट्रीय उधान आहे.
  • वरोरा – बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन प्रकल्प येथे आहे.
  • मूल – धानाच्या किंवा भाताच्या गिरण्यांकरीत्या प्रसिद्ध.
  • सोमनाथ – निसर्गरम्य ठिकाण, रोगमुक्त झालेल्या कुष्ठरोग्यांची वसाहत व श्रमसंस्कार शिबीरे यासाठी प्रसिद्ध आहे.
Must Read (नक्की वाचा):

जगातील औद्योगिक शहरे

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.