नमामि गंगे योजना (Namami Gange Yojana)
नमामि गंगे योजना (Namami Gange Yojana)
Must Read (नक्की वाचा):
- नमामि गंगे योजनेचे कार्य 3 टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल.
- नमामि गंगे योजना 5 राज्यांमध्ये गंगा किनारी स्थापित 103 गावे, झोपडपट्टी आणि शहरांमध्ये या योजनेचे कार्य करण्यात येईल.
- नमामि गंगे योजना उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, प. बंगाल, हरियाणा आणि दिल्लीमध्ये सुरू करण्यात आली आहे.
- नमामि गंगे योजनेअंतर्गत गंगा नदीमध्ये मिसळणारे अस्वच्छ पाणी, अस्थविसर्जन, कचरा इत्यादि बंद करण्यासाठी नदीकिनार्यावर Sivej Tritment Plan राबविण्यात येईल.
- नमामि गंगे योजनेअंतर्गत घाटांची निर्मिती आणि आधुनिकीकरण करण्यात येईल.
- नमामि गंगे योजनेअंतर्गत 231 प्रोजेक्ट सुरू करण्यात आले आहेत.
- गंगा नदीकिनारी 8 जैव-विभाजन पार्क विकसित करण्यात येतील.
- गंगा नदीकिनार्यालगत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येईल.
- नमामि गंगे योजनेसाठी जपानव्दारे वित्तीय मदत प्राप्त होईल.
- नमामि गंगे योजनेची उद्दिष्ट – गंगेच्या संवर्धन, संरक्षण, शुद्धीकरणाचा सर्वंकष कार्यक्रम
- नमामि गंगे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची त्रिस्तरीय यंत्रणा – राष्ट्रीय स्तर – उच्चस्तरीय कार्यकारी गट – अध्यक्ष कॅबिनेट सचिव
- राज्य स्तर – मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समित्या
- जिल्हा स्तर – जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या
- नमामि गंगे प्रकल्पावर येत्या 5 वर्षांत 20,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील.
- नमामि गंगे योजनेअंतर्गत मार्च 2019 पर्यंत गंगेत सांडपाणी जाणारच नाही हे केंद्र सरकारव्दारे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
- नमामि गंगे योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी “राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान” व संबंधित राज्यातील राज्या कार्यक्रम व्यवस्थापन गटांवर सोपविण्यात आली आहे.
- नमामि गंगे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगेच्या किनारी राहणारे लोक व स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी करून घेण्यात येतील.
- नमामि गंगे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “गंगा टास्क फोर्स” ची स्थापना करण्यात येणार आहे.