नेताजींच्या नावे राष्ट्रीय पुरस्कार (संपूर्ण माहिती)
नेताजींच्या नावे राष्ट्रीय पुरस्कार (संपूर्ण माहिती)
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 ऑक्टोबर 2018 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा केली.
- 21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद शासनाची सिंगापूर येथे स्थापना केली होती. या घटनेच्या 75व्या वर्षपूर्ती कार्यक्रमात मोदी यांनी ही घोषणा केली.
- हा पुरस्कार आपत्ती निवारण प्रतिसाद मोहिमेमध्ये अतुलनीय कार्य करणार्या पोलिसांना देण्यात येईल.
- या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी नेताजी जयंती (23 जानेवारी) या तारखेस होईल.
- 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लाल किल्ला येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आझाद
हिंद सेनेतील नेताजींचे निकटवर्तीय लालती राम उपस्थित होते. लालती राम यांनी भेट दिलेली टोपी नरेंद्र मोदी यांनी यावेळी परिधान केली होती. - 21 ऑक्टोबर 2018 रोजी राष्ट्रीय पोलीस स्मारक दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे पोलीस स्मारक व संग्रहालयाचे लोकार्पण केले तसेच ग्रॅनाईट शिल्पाचे अनावरण केले.
1. जन्म: 23 जानेवारी 1897 (कटक).
2. 1938 हरीपुरा काँग्रेस अधिवेशन, 1939 त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष.
3. काँग्रेसमधून बाहेर पडून फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना (1939).
4. ऑक्टोबर 1943 मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना.