सरळ सेवा परीक्षेबाबत निघालेल्या नवीन GR संबंधी ठळक बाबी

Maha Bharti New GR 2020 Complete Information

नमस्कार मित्रांनो, आगामी काळात होणाऱ्या परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्वाचा GR हा 17 ऑगस्ट 2020 रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. त्या GR मधील काही महत्वाच्या बाबी खालील लेखामध्ये मांडल्या आहेत, तरी सर्व माहिती शेवटपर्यंत वाचावी. GR डाउनलोड करण्यासाठी लिंक सर्वात शेवटी दिली आहे.
Mega Bharti New GR

सरळ सेवा परीक्षेबाबत निघालेल्या नवीन GR संबंधी ठळक बाबी

  1. (MPSC कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील पदभरती प्रक्रियेसाठी जिल्हा निवड समिती, प्रादेशिकस्तरीय निवड समिती व राज्यस्तरीय निवड समितीची स्थापना करण्यात येईल.
  2. पदांची जाहिरात, संपूर्ण निवडप्रक्रिया ते अंतिम निवड यादी प्रसिध्द करणे ही सर्व जबाबदारी निवड समितीची असेल.
  3. निवड करण्यात आलेल्या सर्विस प्रोव्हायडर कडे अर्ज स्वीकारणे, परीक्षा शुल्क स्वीकारणे व सर्व बाबी तपासून परीक्षेचे प्रवेशपत्र तयार करणे व परीक्षेचा निकाल तसेच शिफारस झालेल्या/ न झालेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित करणे हि जबाबदारी असेल.
  4. संबंधित पदांच्या पदभरतीसंदर्भात तज्ञ व्यक्तींकडून प्रश्नपत्रिका तयार करणे व तसेच प्रश्नसंच व उत्तरपत्रिका तयार करण्याची जबाबदारी हि संबंधित जिल्हा/ प्रादेशिक व राज्य निवडसमित्यांच्या अध्यक्षांची असेल.
  5. तसेच वरील सर्व नियम हे शिक्षणसेवक (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग), पोलीस शिपाई (गृह विभाग), कृषी सेवक (कृषी व पदुम विभाग), कंत्राटी ग्रामसेवक (ग्रामविकास व जलसंधारण विभाग), अंगणवाडी सेविका (महिला व बालविकास विभाग), आरोग्य सेवक(सार्वजनिक आरोग्य विभाग) व नगरविकास विभाग ई. पदांच्या पदभरतीसाठी अनिवार्य नसतील ते सुधारित परीक्षा पद्धतीचा पर्याय स्वीकारू शकतील.

नवीन GR नुसार होणाऱ्या परीक्षेबाबत शक्यता

  1. नवीन GR बारकाईने बघितल्यास असे लक्षात येते कि होणाऱ्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने न होता ऑफलाईन पद्धतीने होण्याची शक्यता आहे.
  2. तसेच संबंधित विभागाची परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी आयोजित करण्याचा विचार असू शकतो.
टीप : वरील फक्त शक्यता आहेत, त्यासंबंधित स्पष्टता नवीन GR प्रकाशित झाल्यावर स्पष्ट होईल.

GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वरील माहिती आवडल्यास कृपया तुमच्या मित्रांसोबत शेयर करण्यास विसरू नका.
 
धन्यवाद.
 
– Team MPSC World
You might also like
1 Comment
  1. nitin digamabar shelke says

    Please sir Navin zp megha bharti kadun amcha sarkhe berojgar mulana dhir dyava sirji lai vait vatat ahe ya ghadi la amala amachi lachari pahul manun swatala amchavarch hasu yet ahe bga sir …………..

Leave A Reply

Your email address will not be published.