पाण्याची टाकी व नळ वरील उदाहरणे

पाण्याची टाकी व नळ वरील उदाहरणे

Must Read (नक्की वाचा):

वेग, वेळ आणि अंतर


नमूना पहिला –

उदा. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते; तर दुसर्‍या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल?

  • 3 तास
  • 2 तास 30 मि.
  • 4 तास
  • 4 तास 30 मि.

उत्तर : 4 तास

स्पष्टीकरण :-
टाकी पूर्ण भरण्यास

1 ल्या नळाला 6 तास लागतात.     
पहिल्या नळाने 1 तासात टाकी 1/6 भरते.
2 र्‍या नळाला 12 तास लागतात.     
दुसर्‍या नळाने 1 तासात टाकी 1/12 भरते.
दोन्ही नळांनी एका तासात 1/6+1/12=3/12 टाकी भरते.
पूर्ण टाकी भरण्यास 12/3 = 4  तास लागतील
टाकी भरण्यास लागणारे एकूण तास = 4 तास

 नमूना दूसरा –

उदा. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. तर दुसर्‍या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासांत रिकामी होईल?

  1. 6
  2. 8
  3. 12
  4. 10

उत्तर : 12

स्पष्टीकरण :-
पहिला नळ 6 तासात टाकी भरतो.

प्रमाणे 1 तासात 1/6 टाकी भरते.
दूसरा नळ 4 तासात रिकामी करतो म्हणजेच

1 तासात ¼ टाकी रिकामी होते.
दोन्ही नळ चालू केल्यास किती तासात टाकी रिकामी =1/4-1/6=3/12-2/12=1/12 होईल.
दोन्ही नळ चालू केल्यास पूर्ण टाकी रिकामी होण्यास 12 तास लागतील.
Must Read (नक्की वाचा):

काळ, काम आणि वेग

You might also like
1 Comment
  1. Chetan atalkar says

    C

Leave A Reply

Your email address will not be published.