पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेवर पुन्हा स्थगिती, त्रुटी दूर करून घेणार परीक्षा
महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच याबाबत खुलासा केला कि, “पुढील आठवड्यात होणाऱ्या पशुसंवर्धनाच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, सर्व त्रुटी दूर करून महापरीक्षा पोर्टलद्वारे पुन्हा परीक्षा घेण्यात येईल.” त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागातर्फे ७२९ जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली होती. महापरीक्षा पोर्टल द्वारे मार्च २०१९ मध्येच उमेदवारांची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पशुधन पर्यवेक्षक व परिचर या पदांच्या एकूण ७२९ जागांसाठी हि भरती होत आहे. सध्या डिसेंबर सुरु असून, अजूनही पशुसंवर्धन विभागाची परीक्षा झालेली नाही. अगोदर पण एकदा हि परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती व आता पुन्हा परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.
झाले असे कि, या विभागाची परीक्षा ऑगस्ट मध्येच घेणार होते व त्याबद्दलची सर्व तयारी देखील पूर्ण झाली होती, परंतु कोल्हापूर-सांगली येथील पूरस्थितीमुळे त्यावेळी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. नंतर निवडणुकीची आचारसंहिता व काही अन्य समस्येमुळे परीक्षा झाली नव्हती. आता पुन्हा हि परीक्षा सुरु होणार होती व सर्व उमेदवारांना प्रवेशपत्रांचे वाटप देखील झाले होते, परंतु सध्या महापरीक्षा पोर्टलबद्दल वाढलेला असंतोष व सातत्याने नवीन सरकारकडे महापोर्टल बंद करा म्हणून होत असलेल्या मागणीमुळे सरकारने यामध्ये आता लक्ष घातले आहे व तूर्तास सर्व परीक्षांना स्थगिती दिली आहे.
#महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती;पुढील आठवड्यातील #पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुढे ढकलली मात्र त्रुटी दूर करुन ही ऑनलाईन परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच घेण्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे निर्देश २/३ pic.twitter.com/cKNcHO07XK
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 7, 2019
महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच याबाबत खुलासा केला कि, “पुढील आठवड्यात होणाऱ्या पशुसंवर्धनाच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, सर्व त्रुटी दूर करून महापरीक्षा पोर्टलद्वारे पुन्हा परीक्षा घेण्यात येईल.” त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. बऱ्याच महिन्यांपासून विद्यार्थी या परीक्षेची वाट बघत आहेत, परंतु अजून त्यांना काही दिवस वाट बघावी लागणार आहे.
पशुसंवर्धन विभाग मेगाभरती बद्दल थोडी माहिती
पदवीधर उमेदवारांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परिचर पदासाठी ५८० तर पशुधन पर्यवेक्षक पदासाठी ५८० जागा भरण्यात येणार आहे. अश्या एकूण ७२९ जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली असून, ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया मार्च मध्येच पूर्ण झालेली आहे.