पेशींबद्दल संपूर्ण माहिती

पेशींबद्दल संपूर्ण माहिती

Must Read (नक्की वाचा):

हिवताप व त्याची लक्षणे

1. प्रस्तावना :

इ.स.1665 मध्ये रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशी या सजीवातील मुलभूत घटकाचा शोध लावला.

त्याने बुचाचा पातळ काप घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला असता मधाच्या पोळ्याप्रमाणे सदरची रचना दिसली. त्या कप्प्यांना पेशी (cell) असे नाव दिले. विज्ञानाच्या इतिहासातील ही अत्यंत महत्वाची घटना आहे.

प्रत्येक सजीव भिन्न असला तरीही तो याच, एकमेकांपासून विलग अशा छोटया घटकापासून बनलेला असतो. त्यांना पेशी असे म्हणतात. इमारतीमधील वीट आणि सजीवामधील पेशी हे मुलभूत रचनात्मक घटक असतात.

पृथ्वीवर एकाच पेशीपासून बनलेले एकपेशीय तसेच अनेक पेशीपासून बनलेले बहुपेशीय सजीव आढळतात.

एकपेशीय सजीवांमध्ये सर्व प्रक्रिया आणि कार्ये एकाच पेशीद्वारे केली जातात.

उदा. अमिबा, पॅरामेशियम,युग्लीना

पेशी अभ्यासाशी संबंधित शास्त्रज्ञ :

झकॅरीअस जॅन्सन– सुक्ष्मदर्शकाचा प्रथम शोध (1590)

रॉबेर्ट हूक – बुचातील मृत पेशीचा शोध (1665)

ल्युवेन हॉक – जीवाणू,शक्राणु,आदिजीव यांच्या पेशींचे निरीक्षण (1674)

रॉबर्ट ब्राऊन– केंद्रकाचे अस्तित्व (1831)

जॉहॅनीस पुरकिंजे – तरल द्रव्याला प्रद्रव्या नाव दिले.

पेशी सिद्धांत :

एम. जे. शिल्डेन आणि थिओडोर श्वान यांनी सर्व वनस्पती पेशीपासून  बनलेल्या असतात आणि पेशी हा सजीवाचा मुलभूत घटक आहे. हा सिद्धांत मांडला.

कोणत्याहि पेशीचा उगम उत्स्फुर्तपणे होत नसून केवळ पेशी विभाजनाने त्या निर्माण होतात.

पेशींची  संरचना :

अंडे आणि अमिबा दोन्हीही एकपेशीय आहेत.

पेशीचे आकारमान 0.1 um ते 18 cm पर्यंत आढळते.

एक मायक्रोमिटर म्हणजे 1 मिमिचा 1000 व भाग.

सर्वात लहान पेशी -शहामृगाचे अंडे (18CM)

मानवी चेतापेशींना 1 मित्र लांबीचे शेपूट किंवा अक्षतंतू  असतो.

पेशींचा आकार :

मुख्यत्वे तिच्या कार्याशी निगडीत असतो. केशिकांमधून प्रवाह सुलभ होण्याकरिता मानवी लोहित पेशींचा आकार द्विअंतर्वक्री असतो.

शरीरात प्रवेश करणाऱ्या शुक्ष्म जीवना गिळंकृत करण्यासाठी पांढऱ्या रक्तपेशी स्वतःचा आकार बदलू  शकतात.

एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आवेगाचे (impulsus) वहन  करण्यासाठी चेतापेशीची लांबी जास्त असते.

अमिबा पेशी अनियामित असते. शुक्रपेशी सर्पिलाकार असते. तर अंडपेशी गोलाकार असते.

You might also like
3 Comments
  1. Rupali Tangulwar says

    Atishay chan margdarshn hot aahe mala magil kahi diwsapasna…A big thank you mpscworld team..keep the good work going

  2. Mayuri A kangale says

    Pustakapesha mla yatun science smjtey ani mpsc chya babtit hi khup chan margdarshn thrtey a big thnk u mpsc team…..

    1. Dhanshri Patil says

      Thank you so much for your kind words.

Leave A Reply

Your email address will not be published.